वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर लगेच त्यांनी राष्ट्रवादीवरही (NCP) दावा ठोकला. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, आज अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. वय झालं तर पवार साहेब थांबायला तयार नाहीत, तरुण नेतृत्वाला आशिर्वाद द्यायला काय हकरत आहे, मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला. ( Ajit Pawar attacked Sharad Pawar they said pawar saheb are not ready to stop even when they get old)

 

राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची आज पहिलीच जाहीर सभा होत आहे. या सभेत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांच्यानंतर अजित पवार यांनीही जोरदार भाषण केले. यावेळी बोलतांना त्यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीवर भाष्य करत जोरदार टीका केली. ते म्हणाले, प्रत्येकाचं एक वय असतं. आयुष्यभर काम केल्यानंतर एका टप्यावर थांबायला हवं. मग तो शेतकरी असो, सरकारी अधिकारी असो, उद्योगपती असो की राजकारणी… थांबण महत्वाचं आहे. अडवानी- जोशी निवृत्तही झाले. पण, आमचे वरिष्ठ नेते हे थांबायलाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत. पण हे नेमकं कशासाठी आहे? मी सुप्रियाला सांगितले की तू साहेबांशी बोल, त्यांना समजावून सांग.. पण नाही, त्यांना थांबायचंच नाही. तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असा सवाल त्यांनी केला.

पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी पाठवले, फडणवीसांसोबत बैठका झाल्या; अजित पवारांचा गौप्यस्फोट 

चुकलं तर चुकलं म्हणून सांगा. पण तसं ते करत नाही. मागील महिन्यातही त्यांनी राजीनामा दिला आणि तो परतही घेतला. मग राजीनामा परत घ्यायचा होता तर दिलाच कशाला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube