Jayant Patil Criticize Eknath Shinde On Amit Shah Maharashtra Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याच्या कामगारावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना अर्थ मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर आता विरोधकांनीही भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आतमध्ये कोण कोणाच्या पाया पडले माहित नाही, असा टोला यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Ajit Pawar) यांना लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार 345 व्या पुण्यतिथीनिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शहा रायगड येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित (Maharashtra Politics) होते. तर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. याच दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केली असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
मोठी बातमी! पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेड्या, बेल्जियम पोलिसांची कारवाई
दरम्यान असे काहीही बोलणे झाले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यांना काही सांगायचं असेल तर ते थेट माझ्याशी बोलतात, असे देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मात्र आता विरोधकांनीही या विषयावर आपापली मते मांडली आहेत.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती; वाचा, बाबासाहेबांचे लोकशाहीबाबतचे विचार काय होते?
आत जाऊन कोण कोणाच्या पाया पडले माहित नाही –
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी देखील या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते अहिल्यानगर येथील श्रीगोंदा तालुक्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माहित नाही काय तक्रार केली. या अशा बातम्या बाहेरच्याच असतात. आत जाऊन कोण कोणाच्या पाया पडले? याविषयी मी जास्त काही बोलत नाही. आत जाऊन काय त्यांचे प्रश्न असतील ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे. महाराष्ट्रातील सरकार कशा रीतीने चालले, हे देशातील आणि राज्यातील जनता पाहात आहे, असा उपरोधिक टोला माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.