राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार जयंत पाटील ( Jayant Paitl ) हे विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session ) सुरु झाले आहे. त्यासाठी पाटील हे आज विधीमंडळाच्या कामकाजात सहाभागी होणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे.
जयंत पाटील यांचे मागच्या हिवाळी अधिवेशनात निलंबन झाले होते. विधानसभा अध्यक्षांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे जयंत पाटील यांचे मागच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या कालावधी पुरते निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आज ते अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत.
त्यापार्श्वभूमीवर काल जयंत पाटील यांच्या समर्थकांकडून एक व्हीडिओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये ‘टायगर अभी जिंदा है’ असे वाक्य होते. तसेच आता विरोधकांना घाम फुटणार, विरोधकांवर प्रश्नांची सरबत्ती होणार, असा उल्लेख त्या व्हीडिओत करण्यात आला आहे.
दरम्यान जयंत पाटील यांना 9 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावेळेसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाटील हे सत्ताधारी पक्षावर जोरदार प्रश्नांचा हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यांची बोलण्याची पद्धत ही समोरच्याला चिमटे काढत प्रश्न विचारण्याची आहे. विशेष म्हणजे यावेळेसचा अर्थसंकल्प हे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत. जयंत पाटील हे अर्थमंत्री असताना फडणवीस हे त्यांच्याकडे अर्थसंकल्प कसा मांडतात हे समजून घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे हे दोन्ही सत्ताधारी व विरोधक यावेळी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करताना पहायला मिळतील.
(उद्धव ठाकरेंकडे राहिलेत चार कुत्रे त्यापैकी तू.. चिडलेल्या राणेंची जाधवांवर जहरी टीका)