Download App

पुन्हा राजकीय भूकंप! अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा दावा

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Jayant Patil On ajit Pawar Group : राष्ट्रवादीच्या (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटातील काही नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहे. ते लवकरच अजित पवार गटात सामील होणार आहेत, असा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री मंत्री शंभुराजे देसाई यांनी केला होता. त्यानंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही मोठा दावा केला आहे. अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले.

World Cup 2023: न्यूझीलंडचा विजयी चौकार, चेन्नईत अफगाणिस्तानचा धुव्वा 

आज शरद पवारांची आढावी बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार गटाचे अनेक आमदार आमदार संपर्कात आहेत. अनेकांना परत पक्षात यायचं आहे. त्याबाबत विचार सुरू आहे. पण मी आत्ताच त्याच्या खोलात जाणार नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, असं मला वाटतं. त्यांची काही कामं आहेत, ती झाली पाहिजेत. त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणार नाही. योग्य वेळ आली की, पाहू आणि काय ते ठरवू, असं जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांनी अंतिम निर्णय शऱद पवारच घेतील, असंही म्हटलं आहे.

आमदार परत आले तर त्यांना पक्षात घेणार का, असं विचारलं असता पाटील म्हणाले की, पक्षात परत घ्यायचं का? याबाबतचा निर्णय शरद पवार घेतली. अंतिम निर्णय त्यांचाच असेल. मात्र, अजित पवार गटातील अनेक आमदारांची परत येण्याची इच्छा आहे, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी आढावा बैठकीतील चर्चेवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज लोकसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक घेण्यात आली. कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या जिलह्यात लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. उद्या उर्वरित जिल्ह्यातील आढावा घेतला जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत चांगली परिस्थिती आहे. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी नावे आली आहेत. अनेक जण इच्छुक आहेत. चर्चा करून निर्णय घेतले जाणार असल्याचं ते म्हणाले.

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. लवकरच राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. अशातच जयंत पाटील यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून उलटसूलट चर्चांना उधाण आलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज