World Cup 2023: न्यूझीलंडचा विजयी चौकार, चेन्नईत अफगाणिस्तानचा धुव्वा
World Cup 2023: न्यूझीलंडने विश्वचषकच्या (NZ vs AFG) 16 व्या सामन्यात अफगाणिस्तानचा 149 धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि त्यानंतर गोलंदाजीनं धुमाकूळ घातला आणि अफगाणिस्तानचा डाव 139 धावांत गुंडाळला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 288 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 71 आणि कर्णधार टॉम लॅथमने 68 धावा केल्या. तर गोलंदाजीत फर्ग्युसन आणि सँटनर यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला अफगाणिस्तानचा संघ 34.4 षटकांत ऑलाआउट झाला. रहमत शाहने संघासाठी 36 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 1 चौकाराचा समावेश होता. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सातत्याने विकेट्स गमावल्या.
नेदरलँडच्या उलटफेरनं वर्ल्डकपचं कॅलक्युलेशन बदलणार का? जाणून घ्या समीकरण
अफगाणिस्तानला पहिला धक्का सहाव्या षटकात 27 धावांवर बसला तो रहमानउल्ला गुरबाजच्या 11 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर पुढच्याच षटकात दुसरा सलामीवीर इब्राहिम जरदान 14 धावा काढून ट्रेंट बोल्टचा बळी ठरला. यानंतर 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीला (8) लॉकी फर्ग्युसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर 26 व्या षटकात ट्रेंट बोल्टने अजमतुल्ला उमरझाईला (27) कीपर हातीच्या झेला देऊन बाद केले.
UT 69 Trailer: राज कुंद्राचे आर्थर रोड जेलमधील अनुभव दाखवणारा, ‘UT 69’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
यानंतर अफगाणिस्तानचा एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही आणि विकेट पडण्याची सिलसिला सुरूच राहिला. 29व्या षटकात शांत खेळी खेळणारा रहमत शाह 36 धावा करून बाद झाला. त्यानंतर मोहम्मद नबी 7, रशीद खान 8, मुजीब उर रहमान 4, नवीन उल हक 0 आणि फजल हक फारुकी 0 धावांवर शेवटची विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतले. अफगाणिस्तानने अवघ्या 2 षटकांत शेवटचे चार विकेट गमावले.
किवी गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी
न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन आणि मिचेल सँटनर यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या. याशिवाय ट्रेंट बोल्टने 2 फलंदाजांना तंबूत पाठवले. तर मॅट हेन्री आणि रचिन रवींद्र यांना 1-1 विकेट घेतली.