Jayant Patil Reaction on CM Devendra Fadnavis Statement : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्या (Jayant Patil) भाजप प्रवेशाच्या चर्चांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. आता यावर शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या पक्षप्रवेशासाठी त्यांना कुणी अर्ज केला होता का? असा मिश्किल सवाल जयंत पाटील यांनी केला.
खरंतर दोन दिवसांपू्र्वी शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे (Annasaheb Dange) यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशा संदर्भात प्रश्न विचारला होता.
महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; आज ५५ वा वाढदिवस, असा आहे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास
आता सत्तेत जाण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की त्यांनी राज्य चालवण्याला जास्त महत्व द्यावं. कारण सत्तेत 238 आमदार आले आहेत. त्यामुळे आता आणखी काही अपेक्षा करण्याची गरज नाही. माझ्या पक्षप्रवेशासाठी त्यांना कुणी अर्ज केला होता का? पण पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यामुळे त्यावर त्यांना उत्तर देणं आवश्यक होतं असे जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
सांगलीतून आणखी काही प्रवेश होतील का असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता. यावर तुम्हाला जो प्रवेश (जयंत पाटील) अपेक्षित आहे तो प्रवेश सध्या तरी आमच्या मनात नाही असे उत्तर फडणवीस यांनी दिले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवारांना धक्का! अण्णासाहेब डांगे 23 वर्षांनंतर पुन्हा भाजपात; फडणवीसांकडून आठवणींना उजाळा