Ajit Pawar Vs Jayant Patil : हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याच्या अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र, अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnvis) कोंडीत पकडताच उपमुख्यमंत्री अजितदादांनी (Ajit Pawar) जयंत पाटलांना झापल्याचं पाहायला मिळालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोंडीत पकडण्याचा डाव टाकला. मात्र, जयंत पाटलांनी फडणवीसांना कोंडीत पकडताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटलांना चांगलचं झापल्याचं पाहायला मिळालं आहे. आमच्यात चांगलं अंडस्टॅंडिग असल्याचं म्हणत हे धंदे बंद करा, या शब्दांत अजित पवार आक्रमक झाल्याचं दिसून आले आहेत.
‘त्या’ विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होणार! भाजप आमदारांची मागणी अन् लोढांकडून पूर्तता
विदर्भाच्या प्रश्नावरुन देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरु होती. फडणवीसांनी उत्तर दिल्यानंतर त्यावर प्रत्युत्तर म्हणून जयंत पाटील यांनी विदर्भाच्या प्रश्नाबाबत अजितदादांनी काल घेतलेली भूमिका सांगितली. त्यावरुन अजित पवारही चांगलेच आक्रमक होत त्यांनी जयंत पाटलांनी थेट हे धंदे बंद करा, असं सुनावलं आहे. यावेळी फडणवीसांसाठी अजितदादा मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे.
Winter Session : जगदीप धनखड यांच्यावरील मिमिक्री करून राजकीय वातावरण तापवणारे कल्याण बॅनर्जी कोण?
सत्ताधाऱ्यांनी विदर्भाचा प्रश्न मांडला म्हणून मांडला नाही. आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विड्रॉल करत असल्याचं काल अजितदादांनी सांगितलं होतं. अद्याप अधिवेशन संपलं नाही त्यामुळे आजही अधिवेशन आहे असं गृहित धरुन आम्ही सगळे बसत आहोत. या विषयावर आता चर्चा होणारच आहे. सभागृहात तुम्ही प्रश्न मांडला काय आम्ही मांडला काय? दहा दिवस अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव, इकडून एक असं लिमिटेड काळ होता. म्हणूनच आम्ही म्हणत होतो की, एक महिना अधिवेशन घ्या. नागपूरची हवा आम्हाला जास्ती दिवस द्या, असं जयंत पाटलांचं अर्धवट बोलणं सुरु असतानाच अजितदादांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाटील म्हणाले, दोन मिनिटे माझं अजून झालेलं नाही दोघांत बसून ठरवा कोण बोलणार आहे, त्यावर अजितदादांनी सुनावलं आहे.
‘मराठ्यांना ओबीसीत घ्या मग जातिनिहाय जनगणना करा’; जरांगेंची आजही नवीन मागणी
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
बसून ठरवायचं काही कारण नाही. आमचं चांगलंच अंडरस्टॅंडिग आहे. कोणी कधी बोलायंच ते आम्हाला कळतं. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला तेव्हा विरोधकांनी सांगितलं पाहिजे होतं की, आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचं नाही. इथं एक बाहेर वेगळं बोलायंच हे धंदे बंद करा, असं अजित पवार म्हणाले आहेत.