Download App

प्रतिस्पर्ध्याबद्दल आदर व्यक्त करणे ही भारतीय संस्कृती…, विरोधकांच्या टीकेला जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Jayant Patil Ahmednagar Speech : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, या लढतीवरून सुप्रिया सुळेंनी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने माझ्या आईला लोकसभा निवडणुकीत उतरवलं असल्याचं सुळे म्हणाल्या. त्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून आई असतील तर सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढू नका, अशी टीका होते. त्यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.

Bhumi Pednekar: ‘फीमेल लीड प्रोजेक्ट’ हा शब्द मला अजिबात आवडत नाही’, अभिनेत्री थेटच बोलली 

समोरच्याचा आदर करणे ही भारतीय संस्कृती आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया ताईंच्या नात्यातला असला तरी याचा अर्थ त्यांनी निवडणूक लढवू नये, असा होत नाही. त्या पूर्ण ताकतीने निवडणूक लढतील आणि जिंकतील, असं जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे अहमदनगर दक्षिणेतील उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ पाटील यांच्या उपस्थितीत मोहटादेवी गडावर दर्शन आणि त्यानंतर स्वाभिमान जन संवाद यात्रा सुरू करून करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.

Pakistan Cricket मध्ये कर्णधार पदावरून वातावरण तापलं; उचलबांगडी केल्यामुळे आफ्रिदी नाराज 

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा विषय आता मिटला असून एक-दोन जागांवर थोडे समज-गैरसमज आहेत ते एकदोन दिवसांत मिटतील, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.

निलेश लंके हे जनतेसाठी झटणारे नेतृत्व आहे. समोर कितीही मोठा उमेदवार उभा असल्याचे वाटत असले तरी जनतेने लंके यांच्या विजयासाठी निवडणूक हातात घेतली आहे. ही निवडणूक एकतर्फी होणार असून निलेश लंके मोठया मताधिक्याने जिंकून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

लंकेंचं काम विद्यमान खासदार विसरले
समोरचा उमेदवार आपल्या पाच वर्षात केलेले कामे सांगत निलेश लंके यांनी काय काम केले? असा मुद्दा उपस्थित करत आहेत. यावर बोलताना पाटील म्हणाले की, लंकेंनी कोरोना काळात केलेले काम समोरचा उमेदवार विसरलेला दिसतोय. तसेच आम्हीही 2019 ला सत्तेत आल्यानंतर कोरोना काळात देशात सर्वोत्कृष्ट काम केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, अशी अनेक कामे आम्ही केली असून आम्ही ती कामे प्रचार सभातून सांगणार आहोत. विद्यमान खासदारांनी संसदेत या दुष्काळी भागातील किती प्रश्न उपस्थित करून सोडवले आहेत. देशातील गंभीर घटनांत किती आवाज मतदारसंघात उमटला आहे, याचे उत्तर खासदारांना जनता विचारत आहे असे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीतील अनेकजन भाजपच्या संपर्कात असल्याने आघाडीत बिघाडी होणार असल्याचे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे, यावर बोलताना जयंत पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत आघाडीत बिघाडी होणार नाही, आघाडीत बिघाडी होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत पण सगळ्यांचा भ्रमनिरास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

follow us