Jayant Patil : पुढील वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांना एकत्र घेऊन इंडिया आघाडी स्थापन केली. मात्र, अद्याप वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत (India Alliance) समावेश झाला नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत सहभागी होतील,अशी चर्चा आहे. अशातच आज त्यांनी महाविकास आघाडीकडे लोकसभा निवडणुकांसठी १२ जागांची मागणी केली. त्यांनी तसं पत्रही लिहिलं. दरम्यान, यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.
IND vs SA:आफ्रिकेसमोर फलंदाजांचे सपशेल लोटांगण ! पहिल्या कसोटीत भारताचा डावाने पराभव
आज माध्यमांशी संवाद साधतांना जयंत पाटलांनी आंबेडकरांनी सुचवलेल्या फॉर्म्युल्याविषयी विचारले होते. त्यावर बोलतांना पाटील म्हणाले की,आमच्या महाविकास आघाडचे तीन जे प्रमुख घटक आहेत, त्यांची अद्याप बैठक झाली नाही. पण, प्रकाश आबेडकरांनी १२ जागांची मागणी केली असेल तर त्याचा विचार सर्व पक्ष करतील. महाराष्ट्रात सर्व विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका आहे. त्यासाठी सर्वांना सोबत घेतल्या जातं आहे. कोणीही वेगळी चुल स्थापन करून नये. कारण, वेगळी चुल स्थापन करणं याचा अर्थ सत्ताधारुढ पक्षाला मदत करणं होतं, असं पाटील म्हणाले.
गड राखण्यासाठी CM शिंदेंचा राज्यभर दौरा; खासदारांच्या मतदारसंघात जाहीर सभांचं नियोजन
ते म्हणाले, सत्तारूढ पक्षाला मदत होईल असे कृत्य कोणत्याही पक्षाकडून होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं आम्ही एकदिलाने काम करत आहोत. प्रकाश आंबडेकरांची भूमिका सकारात्मक असेल तर त्यांच्याशीही चर्चा करू. एक एकसंघपणाने महाराष्ट्रात काम केलं पाहिजे, ही आंबडेकरांचीही भूमिका आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल.
आंबेडकरांनी सुचवलेला फॉर्म्युला काय?
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाटणा, बेंगळुरू येथे इंडिया अलायन्सची बैठका झाल्या. त्यानंतर मुंबईत तिसरी बैठक झाली. या बैठकीला वंचितला बोलावले जाण्याची शक्यता होती. पण तसे झाले नाही. आता लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताना आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पत्र लिहून नवा फॉर्म्युला सुचवला आहे. आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागांची मागणी केली आहे. काँग्रेस, शरद पवार गट, आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी प्रत्येकी १२ जागा लढवाव्यात, उर्वरित 12 जागा वंचित लढवेल, असा असा फॉर्म्युला आंबेडकरानी सुचवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशासाठी आग्रह धरला होता. मात्र, काँग्रेसने हा विषय आतापर्यंत प्रलंबित ठेवला होता. मात्र, तीन राज्यात काँग्रेसचा पराभव झाल्याने काँग्रेस काही प्रमाणात बॅकफूटवर गेली. अशा स्थितीत इंडियाच्या आगामी बैठकीत वंचिताच्या प्रवेशाचा चर्चिल्या जाऊ शकतो. आता खुद्द आंबेडकरांनी इंडिया आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही पत्र लिहिले आहे. त्यांनी फॉर्म्युलाही सुचवला. हा फॉर्म्युला मान्य झाला आणि वंचितचा इंडियात समावेश झाल्यास इंडियाची ताकद मजबूत होईल. दरम्यान, आंबेडकरांचा फॉर्म्युला इंडिया आघाडीतील घटक पक्ष मान्य करतात का, हेच पाहणं महत्वाचं आहे.