IND vs SA:आफ्रिकेसमोर फलंदाजांचे सपशेल लोटांगण ! पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव

  • Written By: Published:
IND vs SA:आफ्रिकेसमोर फलंदाजांचे सपशेल लोटांगण ! पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव

Centurion Test : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा (India) दारुण पराभव झाला आहे. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. पहिल्या डावात केएल राहुल आणि दुसऱ्या डावात विराट कोहलीची झुंजार खेळी वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरलेत. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

पहिल्या डावात भारतीय संघ 245 धावांत गारद झाला होता. तर आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावांची डोंगर उभा करत 163 धावांची आघाडी घेतली होती. आफ्रिकेकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात भारताचा दुसरा डाव अवघ्या 131 धावांत गारद झाला. भारताकडून विराट कोहलीने 76 धावांची झुंजार खेळी केली. परंतु इतर फलंदाजांनी त्याला अजिबात साथ दिली नाही.


Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसच राज्यात महायुतीचा चेहरा?

दोन्ही डावांमध्ये आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पहिल्या डावात केएल राहुलने 101 धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर व इतर फलंदाज चांगला खेळ दाखवू शकले नाही. तर भारताचा पहिला डाव 245 धावांत संपुष्टात आला. तर आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने घातक गोलंदाजी करत पाच, तर नांद्र बर्गने तीन विकेट घेतल्या.

केंद्र अन् ट्रिपल इंजिनने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलयं; सुळेंनी दोन्ही सरकारला धरलं जबाबदार

एल्गरचे तुफान
आफ्रिकेने प्रत्युत्तरात पहिल्या धावात 408 धावांचा डोंगर उभा केला. अनुभवी सलामीवीर डीन एल्गरने भारतीय गोलंदाजांना थकविले. त्याने 185 धावांची खेळी केली. त्यात मार्को यानसेनने नाबाद 84 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमहारने चार आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. तर शादुर्ल ठाकूर, प्रसिध्द कृष्णा आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.

विराट कोहलीचा झुंजार
दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराबू झाली. रोहित शर्मा खातेही न उघडता तंबूत परतला. तर यशस्वी जैस्वाल हा 5 धावांवर बाद झाला. शुबमन गिलही मोठी खेळी करू शकला नाही. तोही 26 धावांवर बाद झाला. तर विराट कोहलीने एकतर्फी झुंज दिली. त्याने 76 धावांची खेळी केली. इतर फलंदाज लवकरच तंबूत परतले. श्रेयस अय्यर सहा आणि केएल राहुल हा चार धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात बर्गरने चार आणि रबाडाने दोन आणि यानसेनने तीन विकेट घेतल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube