Download App

मोदीचं वर्तन हुकूमशाहासारखं, ईडी-सीबीआयनंतर आता लोकपालही…; आव्हाडांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Jitendra Awhad on PM Modi : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर (Ajay Manikrao Khanvilkar) यांनी भारताचे लोकपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या समितीने मान्यता दिली होती.
खानविलकर यांची मंगळवारी लोकपाल (Lokpal) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीवरून शरद पवार आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारवर टीका केली. मोदींच वर्तन हुकूमशाहाप्रमाणं आहे, त्यांनी आणखी लोकपाल या संस्थेलाही कवेत घेतल्याची टीका आव्हाडांनी केली.

राज्यात पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांची एसआयटी चौकशी; जरांगेंच्या चौकशीवरुन पटोलेंनी घेरलं 

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली, त्यात ते म्हणाले की, ईडी, सीबीआय, पोलीस आणि प्रसारमाध्यमानंतर या सरकारने आणखी एका संस्थेला आपल्या कवेत घेतलंय आणि ती म्हणजे लोकपाल.

पुढं त्यांनी लिहिलं की, दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या भ्रष्टाचारविरोधी लोकपालचे नवे अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए.एम.खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती खानविलकर यांनी वादग्रस्त ‘पीएमएलए’बाबत निकाल दिला होता. ज्यामध्ये ‘ईडी’ला समन्स जारी करण्याचे आणि अटक करण्याचे बेलगाम आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये आरोपीला मनी लाँड्रिंग प्रकरणी स्वत: निर्दोष सिध्द करता आलं तरच जामीन दिला जाऊ शकतो. या निकालाचं आता मोट्या खंडपीठाकडून पुनरावलोकन केले जात आहे. पण गेल्या 10 वर्षांचा इतिहास पाहिला तर ‘ईडी’च्या धाडी कुणावर पडल्या आहेत आणि त्यांना स्वत:ला निर्दोष सिध्द करता येईल का, हे तान्ह बाळसुध्दा सांगू शकेल, असं आव्हाड म्हणाले.

विक्रांतच्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा धमाकेदार टिझर रिलीज, उलगडणार गोध्रा कांडाचं सत्य 

ते म्हणाले, नरेंद्र मोदी जगभर प्रवास करून भारतीय लोकशाहीच्या नावाने ढोल बडवत असतात. पण, भारतातील त्यांचं वर्तन हुकूमशाहाप्रमाणेच आहे. सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घ्यायच्या, विरोधकांवर सर्व बाजूंनी दबाव आणून त्यांना गलितगाईत्र करून सोडायचं, जेलमध्ये टाकायच आणि सुटकेचे सर्व मार्ग बंद करून टाकायचे, हीच त्यांची कार्यपध्दती आहे. सर्वकाही लोकांच्या डोळ्यादेखत सुरू आहे, पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना जागं कोण करणार, हा खरा प्रश्न आहे, अशी चिंताही आव्हाडांनी व्यक्त केली.

follow us

वेब स्टोरीज