विक्रांतच्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा धमाकेदार टिझर रिलीज, उलगडणार गोध्रा कांडाचं सत्य

विक्रांतच्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा धमाकेदार टिझर रिलीज, उलगडणार गोध्रा कांडाचं सत्य

The Sabarmati Report Teaser Release : ’12th Fail’ या चित्रपटाने देशभरात खळबळ माजवणारा अभिनेता विक्रांत मॅसी (Vikrant Massey) त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे “द साबरमती रिपोर्ट” यामध्ये तो न्यूज अँकरची भूमिका साकारणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी त्याने त्या चित्रपटाचा धमाकेदार टिझरचा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि या सिनेमाची रिलीज डेट देखील सांगितली आहे. कारण ‘गोध्रा घटना’ 27 फेब्रुवारी 2002 रोजी घडली होती. या व्हिडिओमध्ये विक्रांतचा छोटा अभिनय या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=niQoEU6YyxU

विक्रांत मॅसीने शेअर केला ‘द साबरमती रिपोर्ट’चा टिझर: ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाचा व्हिडिओ शेअर करताना विक्रांत मॅसीने लिहिले की, ’22 वर्षांपूर्वी गोध्रा येथे जळत्या ट्रेनमध्ये 59 लोकांनी आपला जीव गमावला होता, आज मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. तसेच ‘द साबरमती रिपोर्ट’ सादर करत आहे, जो 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

उलगडणार गोध्रा कांडाचं सत्य…: ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात विक्रांत मॅसी न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील एक सीन शेअर करण्यात आला आहे, यानंतर तुम्ही चित्रपट पाहण्यास उत्सुक होऊ शकणार आहात. ज्या दिवशी ‘गोध्रा घटना’ घडली त्याच दिवशी त्यांनी या चित्रपटाची झलक दाखवली. भारतात आतापर्यंत घडलेल्या सर्व घटनांपैकी ‘गोध्रा घटना’ ही सर्वात दुःखद घटना आहे. ज्यात 59 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ यांचा नेमका गुन्हा काय? सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज

हा चित्रपट 3 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार: ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले असून शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये पाहता येईल. 12th Fail चित्रपटाच्या यशानंतर विक्रांत मॅसीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत, ज्यामध्ये अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा समावेश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube