‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ यांचा नेमका गुन्हा काय? सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ यांचा नेमका गुन्हा काय? सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज

Alibaba aani Chalishitale Chor New Poster Released: ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ (Alibaba aani Chalishitale Chor) ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. (Marathi Movie ) मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

हा सिनेमा येत्या 29 मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर दाखल होणार आहेत. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार एकत्र येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे. पोस्टरधील कलाकारांच्या चेहऱ्यावरील चित्रविचित्र, प्रश्नार्थक हावभाव पाहून काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतोय. त्यातच लिपस्टिकचे निशाण ही उत्सुकता अधिक वाढवतेय.

आता यामागचे गुपित मात्र चित्रपट आल्यावरच उलगडणार आहे. यात मु्क्ता बर्वे, सुबोध भावे, श्रृती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून या सगळ्या मातब्बर कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे, तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

अथक परिश्रमानंतर अखेर ‘Mismatched 3’चं शूटिंग पूर्ण! अभिनेत्याने शेअर केले फोटो

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” या चाळीशीतील चोरांनी केलेला गुन्हा जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली असेल. मात्र या गुन्ह्याची उकल चित्रपट आल्यावरच होणार आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. यात विनोद, धमाल, गोंधळ आणि मजा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube