अथक परिश्रमानंतर अखेर ‘Mismatched 3’चं शूटिंग पूर्ण! अभिनेत्याने शेअर केले फोटो

अथक परिश्रमानंतर अखेर ‘Mismatched 3’चं शूटिंग पूर्ण! अभिनेत्याने शेअर केले फोटो

Rohit Saraf Mismatched Season 3: नॅशनल क्रश रोहित सराफने (Rohit Saraf) बीटीएस BTS शेअर करून ‘मिसमॅच 3’च्या (Mismatched Season 3) टीमने प्रोजेक्टचे हैदराबाद मधील शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून (social media) दिली. फोटोंमधून रोहित आणि त्याची सह-कलाकार प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची उत्तम झलक पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf)


नेटफ्लिक्स ओरिजिनलमध्ये ऋषी सिंग शेखावत यांच्या भूमिकेमुळे हा अभिनेता प्रसिद्ध झाला आहे. वेब सीरिजमध्ये ऋषीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला रोहित आता या वेब सीरिज साठी उत्सुक आहे. रोहित मुख्य भूमिकेत असून अनेक सह कलाकारांच्या सोबतीने ही वेब सीरिज घडणार आहे.

‘मिसमॅच्ड 3’ व्यतिरिक्त रोहित त्याच्या रॉम कॉम ‘इश्क विश्क रिबाउंड’ च्या थिएटरमध्ये रिलीजची तयारी करत आहे. या चित्रपटात तो जिब्रान खान, पश्मिना रोशन आणि नैना ग्रेवाल यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसतो. निपुण अधिकारी दिग्दर्शित हा चित्रपट 28 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

‘फायटर’चा अटकेपार झेंडा; जगभरात 360 कोटींचा गल्ला

चाहत्यांची आवडती वेब सीरिज मिसमॅच्ड 3 ही आधीपासूनच जोरदार चर्चेत असलेली सीरिज आहे. सुरुवातीच्या दोन सिझनमध्ये रोहितचे पात्र ऋषी सिंग शेखावत याने चाहत्यांना आपलेसे केल आहे. तर प्राजक्ताचे सतत गोंधळले पात्र चाहत्यांच्या मनात अनोखं स्थान निर्माण करते. या सीरिजमधून चाहत्यांना रोमान्स आणि विनोद यांचा अनोखा संगम अनुभवयाला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube