Prajakta Koliनं चाहत्यांना दिली गुडन्यूज; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिला आश्चर्याचा धक्का

Prajakta Koli

Prajakta Koli Engagement : प्रसिद्ध यू-ट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने तीच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन प्राजक्ताने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्राजक्ता कोळीने आपला एक्स बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

पैसा लग्नावर नाही, शिक्षणावर खर्च करा; माझं लग्न फक्त ५० रुपयांत झालं; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला किस्सा

आज रविवारी सकाळी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन प्राजक्ताने साखरपुड्याची माहिती दिली आहे. त्यानंतर या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

प्राजक्ता कोळीने अचानक साखरपुड्याची घोषणा केल्याने सेलिब्रिटींसोबतच तिच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दोघेही मोठ्या आनंदात दिसत आहेत. प्राजक्ता अनेक वर्षांपासून वृशांक खनालसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. साखरपुड्याची घोषणा करुन फोटो शेअर केला आहे.

Eknath Shinde : CM शिंदे चिडले, ‘त्या’ आरोपांवर पटोलेंना थेट चॅलेंज !

या फोटोमध्ये दोघांच्या हातामध्ये अंगठ्या घातलेल्या दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर प्राजक्ताने एक पोस्ट शेअर करत तिने म्हटले की, वृशांक आजपासून माझा एक्स बॉयफ्रेंड आहे. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांसह अनेकांनी प्राजक्ताला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags

follow us