Download App

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना दाखविले जातेय पैशांचे आमिष; जितेंद्र आव्हाडांचे शिंदे गटावर आरोप

  • Written By: Last Updated:

ठाणे : पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला एक कोटी देतो, तुझ्या पत्नीला एक कोटी देतो, अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु असल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे .

तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामे देतो. ही आहे राष्ट्रवादी (NCP) फोडण्याची पद्धत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर शिवसेना (Shivsena) नेते काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

माजी नगरसेवकांना एक कोटी देण्याबरोबरच नगरसेवक निडणुकीत तिकीट देण्याचे आणि १० कोटी रुपयांची कामे देण्याचे आमिष खुलेआम पैसेवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून केले जात आहे, हीच राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातील प्रभावी नेत्यांना गळाला लावण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून आखली जात आहे. मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवकांनी बंडाची तयारी करत असून त्यांना शिंदे गटाचा पाठींबा असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे लोकमान्यनगर भागातील पक्षाचे प्रभावी नेते हणमंत जगदाळे यांच्यासह तीन नगरसेवकांचा शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक संदेश प्रसारित करत शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

Tags

follow us