Jitendra Awhad on Eknath Shinde : खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याच्या बातम्या काल प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. एकनाथ शिंदे हे सातारा येथील त्यांच्या दरे गावी जात होते. मात्र, पाऊस आणि धुक्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळेच हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईत राजभवन येथे लॅंडिग करण्यात आलं. याच घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्र्यांनाविषयी वाटणारी काळजी व्यक्त केली. पुन्हा असं कधीही करू नका, असा मैत्रीचा सल्ला त्यांनी दिला. (Jitendra Awhad advise to cm Eknath Shinde over halecafter landing issue)
राजकारणात आरोप-प्रत्योरोप करणं हे नवीन नाही. मात्र, दोन राजकीय विरोधक हे चांगले मित्र असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आव्हाड आणि शिंदे यांनी एकत्र काम केलं. त्यांच्यात चांगली मैत्रीही आहे. याच मैत्रिभावनेनं जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी एक पोस्ट लिहिली. आव्हाड यांनी ट्विटवर लिहिलं की, मा. मुख्यमंत्री महोदय, आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्याआधी आपले अतिशय स्नेहाचे संबंध होते.
मा. मुख्यमंत्री साहेब आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते.
काल आपण हट्टाने हॅलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणतं असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असतांना देखिल बळजबरीने त्याला…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 11, 2023
त्यांनी पुढं लिहिलं की, काल आपण हट्टाने हेलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणत असताना, त्याला हवामान खराब असल्याचं सांगितले जात असतांना देखील बळजबरीने त्याला हेलिकॉप्टरने गावी जाण्यासाठी उड्डाण घेण्यास सांगितले. आपण हेलिकॉप्टर साताऱ्याला उतरवल्या नंतर आपण कुठे गेलात हे मला माहिती नाही. पण हवामान खराब असताना कधीही हेलिकॉप्टर उडवू नयेत हे अलिखित जागतिक संकेत आहेत. आपण हे का केलेत ते मला माहिती नाही. पण, हे असं करणं महाराष्ट्राच्या दृष्टिने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टिने चुकीचे आहे. “सर सलामत तो पगडी पचास” अशी एक म्हण प्रचलित आहे
Gadar 2 Review: ‘सनी पाजीचा जोश कायम तर, अमिषा अतिभावनिक; वाचा रिव्ह्यू…
आव्हाड यांनी यावेळी त्यांना मैत्रिचा सल्लाही दिला. आपण अशी भूमिका घेणं किंवा असा हट्ट धरणे हे मला वैयक्तिकरित्या पटलेलं नाही. कारण कोणी काहिही म्हणो आपण एकेकाळचे चांगले मित्र होतो. ह्या नात्यानेच मी हे लिहीत आहे. असे पुन्हा कधीही करू नका, असं आव्हाड म्हणाले.