Gadar 2 Review: ‘सनी पाजीचा जोश कायम तर, अमिषा अतिभावनिक; वाचा रिव्ह्यू…
Gadar 2 Movie Review : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा बहुचर्चित सिनेमा आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘गदर 2’ हा सिनेमा चाहत्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. २२ वर्षांअगोदर सनी देओल (Sunny Deol)आणि अमिषा पटेल (ameesha patel) यांचा ‘गदर: एक प्रेमकथा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने त्याकाळी अक्षरश: बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातल्याचे आपण पाहिले आहेत. भारत- पाकिस्तान या दोन देशात राहणाऱ्या दोन प्रेमींची प्रेमकथा आणि त्यांचं देशप्रेम अतिशय सुंदररित्या मांडण्यात यश आले होते.
खरं तर हा सिनेमा गाजल्यानंतर त्याचा पुढचा भाग देखील प्रदर्शित व्हावा अशी मागणी चाहत्यांनी केली होती. त्यानंतर तब्बल २२ वर्षानंतर या सिनेमाचा सिक्वल प्रदर्शित करण्यात आला आहे. नुकताच ‘गदर 2’ (gadar 2) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मानी घोषणा केल्यापासून तो चांगलाच चर्चेत आला होता. पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर तारासिंग आणि सकिना यांची लव्हस्टोरी बहरली जाणार का अशी जोरदार चर्चा देखील पाहायला मिळाली होती. यामुळे चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे पाहायला मिळत होते. अखेर ११ ऑगस्ट म्हणजेच आज हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
नेमकं ‘गदर 2’चं कथानक काय ?
‘गदर 2’ या सिनेमाची कथादेखील तारासिंग आणि त्याचा मुलगा चरणजीत सिंह यांच्या नात्याभोवती फिरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. ‘गदर2’ मध्ये तारासिंग आणि सकिना यांची रंजक लव्हस्टोरी पुन्हा एकदा दाखवण्यात आली आहे. या शिवाय यावेळी त्यांच्या मुलावर ही कथा एकप्रकारे बेतली आहे. गदरमध्ये त्यांचा चरणजीत सिंह हा लहान मुलगा आता मोठा झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरं तर चरणजीत देखील तारासिंगप्रमाणे देशभक्त दाखवण्यात आला आहे. परंतु देशासेवा करत असताना तारासिंगला म्हणजेच आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी तो जातो आणि पाकिस्तानच्या तावडीत सापडतो. यामुळे पाकिस्तानमध्ये त्याला बंदी केलं जातं. एवढेच नव्हे तर त्याच्यावर खूप अत्याचार केल्याचे देखील या सिनेमात बघायला मिळाले आहे.
देशसेवेने भारावलेला चरणजीत पाकिस्तानपुढे झुकायला आजिबात तयार होत नाही. एकीकडे चरणजीतवर पाकिस्तानमध्ये होत असलेले अन्याय. तर, दुसरीकडे तारासिंग आणि सकिना त्याची घरी परतण्याची वाट बघत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक हालचाली केल्यानंतर देखील शेवटी चरणजीतला पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न फसल्याचे दिसते. यामुळे तारासिंग स्वत: आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा जाण्याचा निर्णय घेतो. तसेच या सिनेमाचे ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे तारासिंग पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या मुलाला सोडवण्यासाठी चांगलीच लढाई केल्याचे बघायला मिळाले आहे. परंतु, नेमकं पुढे काय होतं. तारासिंग चरणजीतला सुखरुपपणे देशात आणतो का? की चरणजीतप्रमाणे तारासिंगला देखील बंदी केले जाते का? असे अनेक प्रश्न हा सिनेमा बघितल्यानंतरच प्रेक्षकांना समजणार आहेत.
तसेच गदर सिनेमात सनी देओलने साकारलेली तारासिंग ही भूमिका चांगलीच गाजल्याची पाहायला मिळाले होते. परंतु, त्याच्या अभिनयाची जादू ‘गदर 2’ मध्ये फारशी दिसून आली नाही. फर्स्ट हाफमध्ये तारासिंग अत्यंत थकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला आहे. तारासिंगच्या वाढत्या वयाची भूमिका सनीने उत्तमरित्या साकारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तारासिंग अभिनयातील एनर्जी दाखवण्यास थोडा कमी पडला आहे. या सिनेमात त्याला पुन्हा एकदा दमदार संवाद मिळाले आहेत. तर, दुसरीकडे अमिषा पटेल ही देखील पुरेशी अभिनय दाखवायची संधी मिळाली नसल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच या दोन्ही हटक्या कलाकारांना कमी स्क्रीन मिळाल्याचे बघायला मिळाले आहे. परंतु, त्यातून देखील ही जोडी उत्तमरित्या काम केल्याचे दिसत आहे. सनी आणि अमिषा यांच्यासोबतच सिमरत कौर, मनीष वाधवा यांनी देखील उत्तमरित्या त्यांच्या भूमिका साकारले आहेत. तसेच या सिनेमाच्या कथानकाला पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे.
सिनेमा पाहायचा की नाही?
गदर: एक प्रेम कथाच्या तुलनेमध्ये, गदर 2 सिनेमात उत्तम आणि सुसूत्र स्क्रिप्टचा अभाव आहे. तसेच सिनेमाची कथा अगदी प्रेडिक्टेबल आहे. चाहते आगामी सीन आणि गाण्यांचा सहज अंदाज लावू शकतात. सिनेमाची पटकथा शक्तिमान तलवार यांनी लिहिली आहे.
त्याच्या संवादांना थिएटरमध्ये जोरदार टाळ्या अन् शिट्ट्या मिळत आहेत. तारा सिंग आणि आर्मी जनरल यांच्यातील संवाद छान लिहिला आहे. तर काही ठिकाणी कृती देखील कथेला मागे टाकत आहे. एवढं सगळं असलं तरी मनोरंजनाच्या दृष्टीने हा सिनेमा ०चांगला बनला आहे, ज्यामुळे तुमचे तिकिटाचे पैसे वसूल होणार आहेत.
प्रेक्षकांची प्रतिक्रिया :
‘गदर 2’ हा सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदरच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळाली आहे. यामुळे या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग देखील उत्तम प्रकारे झाल्याचे बघायला मिळाले आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. अनेकांनी पैसा वसूल झाल्याचं म्हटलं आहे. सिनेमाचा पहिला भाग अत्यंत संथ असला तरी दुसऱ्या भागात गती आहे. अनेकांना या सिनेमाची कथा प्रचंड आवडली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या सिनेमाचा बोलबाला आहे. तर,दुसरीकडे काही प्रेक्षकवर्गाकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. पहिल्या ‘गदर’ची सर ‘गदर 2’ ला नसल्याचं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या सिनेमाला सध्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.