Download App

Jitendra Awhad : धनंजय मुंडेंमुळे चौकशी प्रभावित! गरिबों की जान क्या जान नहीं होती सेठ?

सोमनाथ सुर्यवंशी आणि आणि सतोष देशमुखचे भूत मानेवर बसवणारच. गरिबों की जान क्या जान नहीं होती सेठ? असा सवाल त्यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण विरोधकांनी उचलून धरलं. या हत्याप्रकरणावरून सातत्याने भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याचा मागणी करत आहे. मात्र, अद्याप मुंडेंवर कोणताही कारवाई झाली. यावरून आव्हाडांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली.

Jitendra Awhad : धनंजय मुंडेंमुळे चौकशी प्रभावित! गरिबों की जान क्या जान नहीं होती सेठ? 

सोमनाथ सुर्यवंशी आणि आणि सतोष देशमुखचे भूत तुमच्या मानेवर बसवणारच. गरिबों की जान क्या जान नहीं होती सेठ? असा सवाल त्यांनी केला.

आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बीड हत्या प्रकरणावर बोलतांना ते म्हणाले की, गॅंग ऑफ बीडमध्ये काय चाललंय, ते कळत नाही. नऊ तारखेला संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना होतोय. तरीही या प्रकरणाची चौकशी कुठंवर आली हे कळत नाही. इतकंचं काय तर पत्रकारांना आणि माध्यमांना अंधारात ठेऊन चौकशी होत आहे. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय, पण त्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करावं आणि योग्य कारवाई करावी. मुख्यमंत्र्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. ते काहीतरी करतील. वो दिन कभी तो आयेगा. या हत्या प्रकरणात सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीमधून पीएसआय महेश विघ्ने याची उचलबांगडली केली. तो चौकशी प्रभावित करेल असं असं तुम्हाला वाटतं. मग मुंडे सत्तेत राहिले तर ते चौकशी प्रभावित करणार नाहीत का?  असा सवाल आव्हाड यांनी केला.

सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, मुंडेंवरही कारवाई करणार; संजय शिरसाट थेटच बोलले 

पुढं ते म्हणाले, अंतुले, निलंगेकर, आर. आर. पाटील, विलासराव देशमुख अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांना राजीनामे दिले होते. कॉंग्रेसने त्यांना घरी पाठवलं होतं. खरंतर कॉंग्रेसवाल्यांनी भाजपकडून काही शिकायलं हवं. भाजप सरकारमधील मंत्र्यावर आरोप होतात, मात्र, तरीही ते सत्तेत आहे. त्यांना घरी पाठवलं जात नाही. मात्र, कॉंग्रेस नेत्यांवर आरोप झाले की, कॉंग्रेस पृथ्वी फाटली असं समजत कॉंग्रेस आपल्या नेत्यांना अग्नी परिक्षा द्यायला सांगते, असं आव्हाड म्हणाले.

सरकारला मग्रुरी आलीये

आपण सोमनाथ सुर्यवंशीबद्दल बोलत नाही. तो फुले – शाहू आंबेडकराचा खंदा कार्यकर्ता होता. सरकार त्या प्रकरणाची एक इंचही माहिती देत नाही. दलितांच्या आयुष्यात फक्त मरण यातनाच आहेत का? सरकारला मग्रुरी आलीये. आम्ही या प्रकरणावर बोलतोय तर सरकार टिंगळ टवाळी करतेय, हलक्यात घेते. मात्र, आम्ही आमचा मुद्दा सोडणार नाही. सोमनाथ शुर्यवंशी आणि सतोष देशमुखचे भूत तुमच्या मानेवर बसणारच, असं म्हणत गरिबों की जान क्य जान नही होती सेट, असा सवाल आव्हाड यांनी केला.

 

follow us