सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, मुंडेंवरही कारवाई करणार; संजय शिरसाट थेटच बोलले
Sanjay Shirsat : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण विरोधकांनी चांगलंच उचलून धरलं. या हत्याप्रकरणावरून विरोधक मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची मागणी करत आहे. दरम्यान, आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठे वक्तव्य केलं. याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव समोर आलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं.
मोठी बातमी! विजापूरमध्ये नक्षलवादी हल्ला, सुरक्षा दलाची व्हॅन उडवली, IED स्फोटात 9 जवान शहीद
संजय शिरसाट यांना आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बीड हत्या प्रकरणारव बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या मागे, पुढे, पडद्यामागे आणखी कुठे जो असेल त्याच्यावर कारवाई केला जाईल, असं सांगितलं. त्यानुसार कारवाई सुरु देखील00 झाली आहे. यात कोणीही असला, कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी गय केला जाणार नाही, कारवाई होईलच. यदा कदाचित धनंजय मुंडेंचं नाव आलं तर त्यांच्यावरही कार्यवाही केली जाईल, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असं शिरसाट म्हणाले.
सुजय विखे यांनी शिर्डीत प्रसादालयांमधील मोफत जेवणं बंद करण्याची मागणी केली होती. त्यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. त्यांनी सुजय विखेंच्या वक्तव्याची पाठराखन केली. ते म्हणाले, भिकारी मुक्त देवस्थान आणि मोफत भोजन बंद या सुजय विखे यांच्या वक्तव्याचा मी आज शिर्डी दौऱ्यावर असतांना पूर्ण अर्थ समजून घेतला. काल मला संपूर्ण वस्तुस्थिती माहित नव्हती आणि मी त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला होता. मात्र, आज मी त्याबाबत व्यवस्थित माहिती घेतली. सुजय विखे यांचा भक्तांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. लोक बस किंवा ट्रकने शिर्डीला येतात. व्हाईटनर पित नशा करणारे येतात. त्यांना पायबंद घालावा हा त्यांचा उद्देश या वक्तव्यामागे होते. त्यामुळे या वादावर आता पडदा पडावा, असं मला वाटतं. असे संजय शिरसाट म्हणाले.
बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड धनंजय मुंडेच, अजितदादा त्यांना संरक्षण का देताय?, संभाजीराजेंचा थेट सवाल
शिर्डी देवस्थानचे प्रसादालय आहे, ते सुरूच राहीला आणि तिथे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही”, असंही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही… – फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने कारवाई करत आहेत. काहीही झाले तरी या प्रकरणात कोणी कोणाला वाचण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही, या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी आणि हफ्ते वसुली करतात, अशा सगळ्यांना जबर बसवणार आहे.