मोठी बातमी! विजापूरमध्ये नक्षलवादी हल्ला, सुरक्षा दलाची व्हॅन उडवली, IED स्फोटात 9 जवान शहीद
Naxalite Attack In Bijapur : छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, छत्तीसगडमधील (Chhattisgarh) विजापूर येथे मोठा नक्षलवादी हल्ला (Naxalite Attack) झाला आहे. या हल्ल्यात 9 जवान शहीद झाले आहे. माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या व्हॅनला टार्गेट केले. त्यांनी सुरक्षा दलाचे व्हॅन आयईडीने स्फोट उडवले आणि यामध्ये चालकासह 9 जवान शहीद झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अबुझमद भागात संयुक्त कारवाई करून सुरक्षा दलाचे जवान आपल्या छावणीत परत येत असताना विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर ही घटना घडली. कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ सैनिकांची व्हॅन येताच नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून व्हॅन उडवून दिली असल्याची माहिती समोर आली आहे. तर छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाची व्हॅन आयईडी स्फोटाद्वारेउडवली. यामध्ये नऊ 9 जवान शहीद झाले असल्याची माहिती आयजी बस्तर यांनी दिली आहे.
Chhattisgarh | Nine people – eight Dantewada DRG jawans and one driver, lost their lives after their vehicle was blown up by naxals through an IED blast, in Bijapur. They were returning after a joint operation of Dantewada, Narayanpur and Bijapur: IG Bastar pic.twitter.com/hqsDHnr8XT
— ANI (@ANI) January 6, 2025
मोठी बातमी! 3 नवजात बालकांना HMPV व्हायरसची लागण, सरकारने बोलवली आपत्कालीन बैठक
या घटनेबाबत आयजी बस्तर म्हणाले की, विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे वाहन उडवून दिल्याने ड्रायव्हरसह दंतेवाडाचे 9 डीआरजी जवान शहीद झाले. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथील संयुक्त कारवाईवरून ते परतत होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून संपूर्ण परिसरात नक्षलवाद्यांचा शोध सुरु आहे.