मोठी बातमी! 3 नवजात बालकांना HMPV व्हायरसची लागण, सरकारने बोलवली आपत्कालीन बैठक

मोठी बातमी! 3 नवजात बालकांना HMPV व्हायरसची लागण, सरकारने बोलवली आपत्कालीन बैठक

Hmpv Virus Symptoms :  चीननंतर भारतात देखील आता HMPV व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहे. माहितीनुसार, बेंगळुरूमध्ये (Bangalore) दोन नवजात बालकांना या विषाणूची लागण झाली आहे तर गुजरातमध्ये देखील या व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाला या व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदाबादमध्ये (Ahmedabad) दोन महिन्याच्या मुलाला लागण झाली आहे. तर कर्नाटकामध्ये आठ महिन्यांचा मुलगा आणि तीन महिन्यांच्या मुलीला संसर्ग झाल्याचे आढळले आहे.  कर्नाटकामध्ये गेल्या चोवीस तासात दोन रुग्ण आढळून आल्याने कर्नाटका सरकारने आरोग्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत संपूर्ण देशात तीन HMPV व्हायरसचे 3 रुग्ण समोर आले आहे त्यामुळे भारत सरकार देखील अलर्ट मोडमध्ये आहे.

चीनमध्ये या व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढल्याने भारत सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सूचनांनुसार संशयित प्रकरणांच्या संदर्भात कडक क्वारंटाइन नियमांची अंमलबजावणी करणे आणि योग्य ती खबरदारी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. माहितीनुसार, एचएमपीव्ही संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. खोकला, शिंकणे, स्पर्श करणे आणि बाधित व्यक्तींच्या हात हलवण्यानेही हा आजार पसरतो.

HMPV व्हायरस म्हणजे काय?

माहितीनुसार, एचएमपीव्ही व्हायरस  हा अत्यंत घातक व्हायरस असून  संसर्गजन्य रोग आहे. श्वसननलिकेतून प्रवेश करून फुफ्फुसापर्यंत हा आजार फैलावतो. कोरोना आणि या व्हायरसची लक्षणे एकसमान आहे.

शरद पवारांच्या चिठ्ठित नेमकं काय होत? भुजबळ म्हणाले, ‘पर्दे में रहने दो…’

एचएमपीव्ही व्हायरस मुख्यत्वे लहान मुलं आणि नवजात बालकांना होतो.  खोकला येणं, बलगम होणं, ताप येणं आणि घसा खवखवणं या व्हायरसची लक्षणे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube