शरद पवारांच्या चिठ्ठित नेमकं काय होत? भुजबळ म्हणाले, ‘पर्दे में रहने दो…’
Chhagan Bhujbal Reaction On Sharad Pawar Message : पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचे अनावर करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांनी छगन भुजबळांना एक चिठ्ठी दिली होती. त्या चिठ्ठीमुळे भुजबळ (Chhagan Bhujbal) अन् पवारांमध्ये थोडा संवाद झाला. त्यानंतर ते एकमेकांकडे पाहून हसू लागले. त्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) चिट्ठीत काय लिहून दिले होते? त्यावर भुजबळांनी मिश्किल उत्तर दिलंय.
असंभव! सचित पाटिल आणि मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र, सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
शरद पवारांनी चिठ्ठीत काय लिहून दिलं होतं? असं माध्यमांनी विचारताच भुजबळ म्हणाले, ‘पर्दे मे रहने दो पर्दा ना उठाओ’. 3 जानेवारीला सावित्री फुले जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अन् संध्याकाळी शरद पवारांची भेट (Maharashtra Politics) झाली. राजकीय चर्चा झाली नाही. देशमुख हत्या प्रकरणाची पूर्ण चौकशी करुन सर्वांवर कारवाई करण्याचे फडणवीसांनी आश्वासन दिले असताना मुंडेंचा राजीनामा गरज नाही. मला मंत्री करण्यासाठी कुणाचा तरी राजीनामा घ्यावा, असं माझ्या मनात स्वप्नातही येणार नाही असं देखील भुजबळांनी स्पष्ट केलंय.
तुमच्या मोठमोठ्या संस्था आहेत, तिथे गरिबांच्या मुलांना शिक्षण द्या; खासदार लंकेंचा विखेंवर पलटवार
अशा प्रकारे राजीनामा मागणे चुकीचे वाटते. या प्रकरणात त्यांचा हात असल्याचे समोर आलेले नाही. मुंडेंच्या विरोधात काही पुरावा समोर आला आहे का? असा सवाल देखील भुजबळांनी विचारला आहे. कारण नसताना कुणावर अन्याय होऊ नये. देशमुख हत्या अंगावर शहारे आणणारे प्रकरण आहे. दोषींना फाशी द्या, अशी मागणी भुजबळांनी केलीय. जरांगे ज्या पध्दतीने बोलतात ते चुकीचे आहे, कायदा हातात घेण्याची गरज नाही, लोकशाही आहे ठोकशाही नाही. एकाही निर्दोषावर अन्याय होऊ नये, असे कायदा सांगतो. एखाद्या कार्यकर्त्याने कोणते चुकीचे कृत्य केले तर नेत्याला माहीत नसते, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
2003 मध्ये तेलगी प्रकरणात मी या परिस्थितीतून गेलो आहे, तेलगीला मी पकडले. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. मात्र, विनाकारण मनस्ताप झाला, भोगावे लागले. उपमुख्यमंत्रिपद, गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड यांना समज देण्याची गरज असल्याचं देखील भुजबळ म्हणाले आहेत. गुन्हा सिद्ध झाला नसताना मंत्रिपदाचा राजीनामा घेणे अयोग्य असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय.