तुमच्या मोठमोठ्या संस्था आहेत, तिथे गरिबांच्या मुलांना शिक्षण द्या; खासदार लंकेंचा विखेंवर पलटवार

तुमच्या मोठमोठ्या संस्था आहेत, तिथे गरिबांच्या मुलांना शिक्षण द्या; खासदार लंकेंचा विखेंवर पलटवार

MP Nilesh Lanke Reaction On Sujay Vikhe Patil Statement : माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी साई संस्थानच्या अन्नदानावरून मोठं वक्तव्य केलं होतं. यावर आता खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करण्याची मागणी साई संस्थान प्रशासनाकडे केली होती. त्यामुळं आता साईभक्तांमध्ये (Sai Sansthan) संतापाचे तीव्र पडसाद आहेत. यावर आता खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

मोठी बातमी! भारतात आढळला HMPV व्हायरसचा पहिला रूग्ण, चीनमध्ये आणीबाणी जाहीर

जे वक्तव्य केलंय, ते चुकीचं आहे. याचे पडसाद साईभक्तांमध्ये संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहेत. सुजय विखेंनी भिकारी शब्द पावरला आहे. यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, जो बाबांसमोर नतमस्तक होतो, (Sujay Vikhe Patil Statement) तो साईबाबांचा भाविक आहे. वास्तविक पाहता देवस्थानच्या पैशाबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. तुमच्या मोठमोठ्याला संस्था आहेत. तिथे गरिबांच्या मुलांना शिक्षण द्या ना, असं देखील निलेश लंके म्हणालेत.

त्यासाठी संस्था आहे. ही अखंडीतपणे चालणारी परंपरा आहे. ही परंपरा तुम्ही-आम्ही चालू केली नसल्याचं खासदार लंके म्हणाले आहेत.
न्नदानाची मुहूर्तमेढ बाबांनी रोवलेली आहे. अन्नदान हे अखंडितपणे चालू असतं, असं देखील लंके म्हणालेत. शिक्षणाच्या बाबतीत जरी खर्च करायचं म्हणलं, तर बाबांचे अनेक भाविक आहेत. त्यांच्या हातून बाबा हे कार्य करून घेणार आहेत. हॉस्पीटलचं काम इतकं मोठं चालते, कुठे त्यात कमी पडलं? असा सवाल देखील लंकेंनी केलाय.
Video: मोठी बातमी! प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांना अटक, काय आहे कारण ?

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाकडे भोजनालयातील मोफत जेवण बंद करण्याची मागणी केलीय. अन्नदानात वापरल्या जाणारे पैसे मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करा अशी मागणी सुजय विखेंनी केली. याशिवाय बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण देश येथे येवून फुकट जेवण करतोय, राज्यातील सगळे भिकारी इथे गोळा असून ते योग्य नाही. वेळ आली तर आंदोलन करू असं देखील सुजय विखे म्हणाले होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube