Jitendra Awhad on Sanjay Raut : मंगळवारी दिल्लीत शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आलाय. यानंतर ठाकरे गट (UBT) चांगलाच आक्रमक झाला. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला. राऊतांच्या या टीकेला आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलं.
सारखीच बडबड…राऊतांना काउंसलिंगची गरज, शिवसेना नेत्या शायना एनसींचा हल्लाबोल
प्रामाणिकपणे सांगतो, शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेणार नाही, असं आव्हाड यांनी ठणकावलं.
आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊतांच्या टीकेविषयी बोलतांना ते म्हणाले की, पवार साहेबांचे उंची, महाराष्ट्रातील देशातील त्यांचं राजकारणातील स्थान, त्यांच्या विचारांची उंची ही अतुलनीय आहे. शरद पवार हे या देशात असे राजकारणी आहेत की, त्यांच्य मनात सूड, द्वेष कधीच निर्माण होत नाही. आम्हालाही कधी कधी त्यांचा राग येतो. असं वाटतं की, शरद पवार हे असं का करतात? पण ते करतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अनेक उदाहरणं अशी आहेत, जिथं पवार साहेब जातील, असं वाटत नव्हतं, तिथं शरद पवार जातात. ज्या माणसाने पवार साहेबांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्ष, निशाणी पळवली त्यांच्याविषयही शरद पवारांच्या मनात असूया नाही. त्यांच्या सोबत स्टेज शेअर करताना पवार साहेबांच्या मनात आसूड आणि चिड दिसत नाही. हे खरंतर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे.
पवारांशी आघाडी करताना विचार करायला हवा होता, आता पक्ष…; माजी आमदाराचा ठाकरेंना घरचा आहेर
खोट्या केस करा, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवा, असं राजकारण कधीही शरद पवारांनी केलं नाही. हे मागच्या पाच ते दहा वर्षात सुरू झालंय आणि असं राजकारण करणं शरद पवारांच्या मनात कधी येणार नाही, असं आव्हाड म्हणाले.
शरद पवार कुठल्या मंचावर जातात? याचा विचारही कोणी करू नये. ते राजकारणात कप्पे करतात. राजकीय कप्पा आणि सामाजिक कप्पा वेगळा आहे. शरद पवार हे रसायन समजून घेण्यासारखं आहे. विश्वासघातकी वगैरे शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. लढायची वेळ येईल तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त आक्रमपणे शरद पवार सामोरे जातात, हे लक्षात ठेवा,असं आव्हाड म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
पवारांनी एकनाथ शिंदेंचा सन्मान करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारी गोष्ट आहे. कदाचित पवारांची भावना वेगळी असेल, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. पण ज्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता. यामुळे मराठी माणसांच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही. पण, आम्हालाही राजकारण कळतं, पवार साहेब, असा टोला राऊतांनी लगावला होता.