Jitendra Awhad News : माझ्यावर टीका करणारे टीकाकार श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांना उत्तर देतील काय? असा रोखठोक सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला केला आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची साथ सोडली आहे. यावेळी बोलताना श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांच्या बाजून बोलत भाष्य केलं आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी थेट अजित पवारांना सवाल केला आहे. ठाण्यातून आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
उद्धव ठाकरेंना भाषा बदलावी लागली, आता त्यांचं दुकान बंद….; सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र
जितेंद्र आव्हाड म्हणाले, श्रीनिवास पवार हे अतिशय सुज्ञ स्वभावाचे असून ते अतिशय आत्मीयतेने बोलत होते, त्यांचा व्हिडिओ बघून अतिशय दुःख वाटलं कारण नसताना हे घर फुटलं. ते बरोबर बोलले आहेत, घरातला एखादा फोडायचा, आपलं कुटुंब बरबाद करायचं. ही जी पॉलिसी आहे या पॉलिसीत भाजप यशस्वी ठरलं आहे. शरद पवार यांचे आमच्यावर उपकार आहेत. काय उपकार आहेत? ते मला माहित नाही. पण हे घराणं एक ठेवण्याचे शर्तीचे प्रयत्न पवारांचे हे उभ्या बारामतीला माहित असल्याचंही पवारांनी म्हटलं असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे. तसेच आता माझ्यावर टीका करणारे टीकाकार श्रीनिवास पवार यांना उत्तर देतील काय? असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
‘सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरीतांना बाहेर काढणार’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
तसेच अतिशय दुःख वाटतंय, जे काय होतंय जे काय मी ऐकतोय, जे काही मी बघतोय जे काही यांच्या घरचे बोलतायत यातून तरी महाराष्ट्राला कळेल की, मी जे बोललो श्रीनिवास पवार जे बोलले, घरातल्यांकडूनच येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत हे अतिशय दुर्दैवी असून श्रीनिवास पवार जे काही बोलले आहेत, त्यात फक्त कृतज्ञता दिसते. सख्खा भाऊ बोलतोय, यासारख दुःख नाही, यासारखे दुर्दैव नसल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई : हिंसक आंदोलनांनंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय
काय म्हणाले होते श्रीनिवास पवार?
“तुम्हाला आश्चर्य वाटले की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना (शरद पवार) दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही”