‘सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरीतांना बाहेर काढणार’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

‘सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरीतांना बाहेर काढणार’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

US Presidential Election 2024 : अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार (US Presidential Election 2024) आहेत. या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि (Donald Trump) विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यातच लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प आधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी जो बायडेन सरकारच्या (Joe Biden) धोरणावर घणाघाती टीका केली आहे. अमेरिकेत सध्या स्थलांतरीतांकडून होणाऱ्या गु्न्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. सत्तेत आलो तर सर्वात आधी ओपन बॉर्डर पॉलिसी संपुष्टात आणू, असे आश्वासन त्यांनी अमेरिकन जनतेला दिले आहे. ओहायो प्रांतातील डेटन या उपनगरात आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीत त्यांनी हे वक्तव्य केले.

Donald Trump : ठरलं तर! राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा ट्रम्प-बायडेन टक्कर; ‘या’ उमेदवाराची माघार

फॉक्स न्यूजनुसार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसक टोळ्यांतील सदस्य आणि गुंडांसह लाखो स्थलांतरीतांना अमेरिकेत आश्रय दिल्याचा आरोप बायडेन यांच्यावर केला. ट्रम्प पुढे म्हणाले, की स्थलांतरीतांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमुळे अमेरिकन लोकांनी आपला जीव गमावू नये. मी ज्यावेळी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल तेव्हा माझे प्रशासन सर्वात आधी बायडेन प्रशासनाची ओपन बॉर्डर पॉलिसी संपवून टाकील.

ट्रम्प म्हणाले, स्थलांतरीतांकडून होणाऱ्या गुन्ह्यांत एकाही अमेरिकन व्यक्तीचा मृत्यू होता कामा नये. अमेरिका आणि मेक्सिको बॉर्डरवरील परिस्थितीवर जोर देत ट्रम्प म्हणाले की आम्ही येथील परिस्थिती पुन्हा ठीक करणार आहोत. देशावर होणारे आक्रमण रोखणे आणि अवैध स्थलांतरीत प्रवाशांना पु्न्हा त्यांच्या देशात पाठविण्याचे काम आम्ही करणार आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी आणखी वाढल्या, गोपनीय कागदपत्रप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

दरम्यान, ट्रम्प यांच्यावर 2020 च्या जर्जियाच्या निवडणुकीत निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता ट्रम्प चांगलेच अडचणीत सापडले होते. जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली होती. ट्रम्प सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत.

अमेरिकेतील न्यायालयानं ट्रम्प यांना 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवलं होतं. ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्रपती पदासाठीच्या राज्याच्या प्राथमिक मतदान यादीतून काढून टाकण्यात आलं होतं. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत अध्यक्षीय पदासाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आता डोनाल्ड ट्रम्प यांना सहभागी होता येणार नाही, असंही न्यायालयानं म्हटलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube