Download App

सरकारचे मुंबई आणि टक्केवारीवरच लक्ष, रुग्णालयाचे उद्घाटन करा अन्यथा…; आव्हाडांचा आरोग्यमंत्र्यांना इशारा

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : काही दिवसांपूर्वी ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधेअभावी शेकडो रुग्णांचा बळी गेला होता. त्यावरून सर्व स्तरातून सरकारवर जोरदार टीका झाली. मात्र, अजूनही या घटनांचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आलं नसल्याचं दिसतं. कारण, अद्यापही अनेक ठिकाणी पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. काही ठिकाणी रुग्णालयांचं बांधकाम पूर्ण झाले, मात्र उद्घाटनाअभावी रुग्णालयाचे कामकाज सुरू झालं नाही. त्यामुळं रुग्णांची हेळसांड होते. यावरूनच आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना कडक इशारा दिला.

VIDEO: कडक मराठीवरील गावरान मेवाचे ‘दाजी’ आलेत ! नवीन भाग बघा… 

राज्यातील अनेक विकासकामांचे उद्घाटन रखडले आहे. त्यामुळं विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होते. आता एका रुग्णालयाच्या रखडलेल्या उद्घाटनावरून आमदार आव्हाड यांनी सरकारवर टीका केली. सरकारचे मुंबई आणि टक्केवारीवरच लक्ष आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली. वेळात वेळ काढून तारीख द्या अन् ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करा. अन्यथा, गुरे ग्रामीण रुग्णालयात नेऊन बांधू, असा इशाराही आव्हाडांनी दिला.

Devendra Fadanvis : तुम्ही म्हणाल ‘है तैयार हम’ पण लोक तयार नाहीत; राहुल गांधींच्या भाषणावर फडणवीसांचं उत्तर 

आव्हाड यांनी एका रुग्णालयाचा फोटो ट्वीट केला. आणि लिहिलं की, तानाजी सावंत साहेब शहापूरनजीकच्या खर्डी येथील ग्रामीण रूग्णालयाच्या पायर्‍या आपली वाट पहात आहेत. इमारत तयार आहे, इतर सुविधा सज्ज आहेत. थोड्याफार पैशाची गरज भागवली तर हे उत्तम रूग्णालय गोरगरीब आदिवासींसाठी सुरू होईल. शिवाय, हे रूग्णालय नाशिक-मुंबई हाय-वे लगत असल्याने अपघातग्रस्तांना तातडीच्या उपचारांसाठीही फायदेशीर ठरेल. पण, सरकारचे मुंबई आणि टक्केवारीवरच लक्ष असल्याने त्यांचे या भागाकडे लक्षच नाही. तानाजी सावंतसाहेब, हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे टाळाटाळ करू नका, असं आव्हाड यांनी लिहिलं.

पुढं त्यांनी लिहिलं की, रूग्णालयाच्या उद्घाटनाची फाईल तीन महिने झाले आरोग्य मंत्र्यांच्या टेबलवर आहे. मला माहित आहे की, तानाजी सावंत साहेब व्यस्त आहेत. कोणत्या कामात व्यस्त आहेत, ते मी सांगू इच्छित नाही. तरीही वेळात वेळ काढून तारीख द्या अन् ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करा. अन्यथा, महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे. गुरांना पाणी नाही, चारा नाही; म्हणूनच ५ जानेवारी नंतर आम्ही ही गुरे ग्रामीण रुग्णालयात नेऊन बांधू, असा इशारा त्यांनी दिला. निर्णय घ्या… गोरगरीब रुग्णांसाठी रूग्णालय खुले करा, असंही आव्हाड यांनी लिहिलं.

follow us