‘मंदिर बापाची जहागिरी अन् राम तुमच्या मालकीचा नाही’; जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं

Jitendra Awhad : ..तर या लोकांनी रामालाच पक्षाचं चिन्ह केलं असतं; आव्हाडांचा भाजपवर घणाघात

Jitendra Awhad : राम मंदिर (Ram mandir) कुणाच्या बापाची जहागिरी अन् राम तुमच्या मालकीचा नाही, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, येत्या 22 जानेवारील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. या मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यावरच जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘काम न करता श्रेय घेणाऱ्यांनी जरा लाज बाळगा’; कर्डिलेंचा उल्लेख टाळत तनपुरेंचा हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड म्हणाले, अयोध्येतील राम मंदिरात जाण्यासाठी व्हीआयपीच लागतील का? उद्या एखाद्या मागासवर्गीयाने इच्छा व्यक्त केली तर त्यांना तू व्हीआयपी नाहीस बाजूला हो म्हणतील का? तुम्हाला नेमकं काय आणायचंय देशात…तुम्हाला देशात सर्वांना मंदिर उघडणारे बाबासाहेब हवेत की दरवाजा लहान करुन व्हीआयपींना सोडणार का? हे चालणार नाही. आम्ही दरवाजे तोडून टाकू, तुम्ही कायद्याने आम्हाला रोखू शकत नसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिर कुणाच्या बापाची जहागिरी नाही आणि राम तुमच्या मालकीचाही नाही. एक दिवस जेवढं थोडांट करायचं ते करुन घ्या, त्यानंतर जनता तुमच्यावर राम..राम…राम म्हणायची वेळ आणणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; ’60 टक्के कन्नड’च्या आदेशाचा वाद पेटला

अजित पवार गटाकडून पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही देतील, अशी खोचक टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना चारचाकी देणार असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी अजित पवार गटाकडून गाड्यांची पाहणी करण्यात आली आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल चढवला आहे. प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचे आहे, म्हणजे ते पळून जाणार नाहीत. अजित पवार गटाला पळणाऱ्यांची खूप भीती आहे. निवडणूक जाहीर करा, मग उद्या बघा किती पळापळ होईल. अजित पवार गट ४० काय ४०० गाड्यांचं वाटप करतील. निवडणूक जाहीर झाल्यावर कोणीही पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी देतील , अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ईव्हीएम मशीन मॅनेज :
देशात निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी ईव्हीएम मशीन मॅनेज आहे. मशीनमध्ये चीप आहे. चीप आली म्हणजे मानवी हस्तक्षेप आला . मानवी हस्तक्षेप आला म्हणजे मॅनेज आलं. त्यात चीप नसते तर काहीचं नसतं. चीप मानवनिर्मित आहे त्यात मानव काहीही करु शकतो, कुठूनही सिग्नल सोडू शकतो. ईव्हीएम फास्ट करायची का स्लो करायची हे तो करु शकतो, जगभरातील जर्मनी, फ्रान्स, लेदरलॅंड, अमेरिकेत मशीन बाहेर काढलं जातं तेव्हा कुठेतरी काहीतरी असेल म्हणूनच काढलं असेल ना? असंही आव्हाड म्हणाले आहेत.

follow us