पक्षप्रवेश म्हणजे मेंढर पकडून खाटिकखान्यात न्यायची, संजय राऊतांचा शिंदेंना टोला

मुंबई : ‘कोण आहेत हे पदाधिकारी कोणालाचाही पक्षप्रवेश कारयचा आणि पदाधिकारी म्हणायचं. येडे गबाळे पकडून प्रवेश करतात. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, नाशिकमधील शिवसेना जागेवरच आहे. जमीनीवरची शिवसेना कोठेही गेलेली नाही. हे जे कोण लोक गेले आहेत ते आमच्या लोकांना देखील माहित नाही. मेंढर पकडायचे […]

Untitled Design (16)

Untitled Design (16)

मुंबई : ‘कोण आहेत हे पदाधिकारी कोणालाचाही पक्षप्रवेश कारयचा आणि पदाधिकारी म्हणायचं. येडे गबाळे पकडून प्रवेश करतात. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, नाशिकमधील शिवसेना जागेवरच आहे. जमीनीवरची शिवसेना कोठेही गेलेली नाही. हे जे कोण लोक गेले आहेत ते आमच्या लोकांना देखील माहित नाही. मेंढर पकडायचे आणि न्यायचे खाटिकखान्यात.’ नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला असल्याची चर्चा आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिंदे गटावर अशी टीका केली आहे.

‘तुमच्या हातात न्यायालयाचा कायदा आहे का ? मला जेलमध्ये कसे घालणार ? मला जेलमध्ये कोण कोण घालणार व काय काय बोलत आहे तुम्ही. याची सगळी नोंद चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पाठवलेले आहे. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरण काढली तर ते पन्नास वर्षे सुटणार नाहीत.’ असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी नारायण राणेंना दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सामनातील एका अग्रलेख प्रकरणी संजय राऊत यांना पुन्हा एकदा जेलमध्ये जावे लागेल अशी टिपण्णी केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग दाखवतो मी असा थेट इशारा नारायण राणे यांना दिला आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Exit mobile version