Download App

उद्धव ठाकरेंना काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते; नड्डांचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला, पहिले उद्धव ठाकरेंना द्यावे लागत होते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावे लागत होते. उद्धव ठाकरेंना देखील काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला आहे.

ते चंद्रपूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते. प्रत्येकांकडे जात डोके टेकवण्याच्या नादात डोक खाली करायची वेळ आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली.

मविआ सरकारने दलाली आणि कमिशन खोरी केल्यांचा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात येऊन हिंदुह्दयसम्रटाच्या मुलाने सीबीआयकडे तपास देण्यापासून मागे फिरले.

बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली. ‘मविआ’ सरकारने दलाली आणि कमिशन खोरी केली, अशी टीका नड्डा यांनी केली आहे.

महाविकास आघडीमध्ये डिलरशीप, ब्रोकरेंज आणि ट्रान्सफर असा फंडा होता. खूप दुख: झाले होते की मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी 2019 मध्ये बाळासाहेबांचे विरोधक असणाऱ्या लोकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली. अशा लोकांना माफ करायचे का असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी उपस्थित केला आहे.

Tags

follow us