Download App

Karnataka Election : देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी ठरली; राष्ट्रवादीचं पार्सल…

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात कॉंग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडं निपाणीमध्ये (Nipani)राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP)मोठा झटका बसला आहे. या मतदारसंघात भाजप (BJP) उमेदवार शशिकला जोल्ले (Shashikala Jolle)यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघाबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)एक भाकीत केलं होतं. अगदी त्याचप्रमाणे झालं आहे. या मतदारसंघात शरद पवारांना (Sharad Pawar)धक्का बसला आहे. येथील उत्तम पाटील (Uttam Patil) यांचा पराभव झाला आहे.

SRH vs LSG : हैदराबादने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. त्यातच निपाणीमधून सुरुवातीला आघाडी घेतलेले उत्तम पाटील हे पिछाडीवर पडले आहेत. तर भाजपच्या शशिकला जोल्ले आघाडीवर आहेत. जोल्ले 229 मतांनी आघाडीवर आहेत. यामध्ये उत्तम पाटील यांना 33894 तर शशिकला जोल्ले यांना 35480 मतं मिळाली आहेत.

भाजपच्या शशिकला जोल्ले, काकासाहेब पाटील, उत्तमराव पाटील, आणि जयराम मिरजकर यांच्यात चौरंगी लढत झाली. सरुवातीला राष्ट्रवादीचे उत्तम पाटलांनी आघाडी घेतली होती. भाजपच्या जोल्ले दुसऱ्या क्रमांकावर होत्या, मात्र काही तासांतच हे चित्र पलटलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निपाणीत सभा घेतली होती. त्यात फडणवीसांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोबलं करणार? इथं राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचं बघतो. कॉंग्रेसला आता राहिलेच नाही अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टीका केली होती.

प्रचारादरम्यान उत्तम पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले होते. त्या ठिकाणी सभा घेत पवारांनी फडणवीसांना सडेतोड उत्तर दिलं होतं. दुसरीकडं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मतदानादरम्यान निपाणीत तळ ठोकला होता. मात्र त्याचा मतदानामध्ये रुपांतर करण्यात राष्ट्रवादीला अपयश आलं आहे.

Tags

follow us