धनंजय मुंडेंना धक्का! संबंध हे लग्नासारखेच..,; न्यायालयाच्या निकालाची प्रत समोर

धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली होती. न्यायालयाच्या याच याचिकेची सविस्तर प्रत आता समोर आलीयं.

Dhananjay Munde

Dhananjay Munde

Dhananjay Munde : करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील संबंध लग्नासारखेच असून दोन मुलांना जन्म हे एकाच घरात राहिल्याशिवाय दोन शक्य नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय. दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांनी कौंटुबिय न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका माझगाव न्यायालयाने फेटाळून लावलीयं. न्यायालयाच्या निकालाची सविस्तर प्रत समोर आलीयं.

डिजिटल मंत्रिमंडळासाठी फडणवीस सरकारचा कोटींचा घाट; पण, RTI कार्यकर्ते कुंभारांनी ठेवलं ‘मर्मा’ वर बोट

या निकालामध्ये करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचा निकाल वांद्रेच्या कौंटुबिक न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिलं. माझगांव सत्र न्यायालयाने 5 एप्रिलला रोजी निकाल दिला होता.

धक्कादायक! नाइटक्लबचे छत अचानक कोसळून 66 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video पाहा..

आपल्या याचिकेत करुणा मुंडे यांच्याशी लग्न केलं नसल्याचा धनंजय मुंडे यांनी दावा केला होता. मात्र धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत, असं सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलंयं.

तसेच एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा मुंडे यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version