धक्कादायक! नाइटक्लबचे छत अचानक कोसळून 66 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video पाहा..

धक्कादायक! नाइटक्लबचे छत अचानक कोसळून 66 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video पाहा..

Nightclub Roof Collapse : डोमिनिकन गणराज्याची राजधानी सँटो डोमिंगोतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे मंगळवारी एका नाइटक्लबचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत तब्बल 66 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 160 लोक जखमी झाले आहेत. छत कोसळल्यानंतर या छताच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले आहेत. या लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे डायरेक्टर जुआन मॅन्यूअल मेंडेज यांनी सांगितले की ढिगाऱ्याखाली दबलेल्यांत अजूनही काही जण जिवंत आहेत.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांत मोंटेक्रिस्टीच्या गव्हर्नर नेल्सी क्रूज यांचाही समावेश आहे. मेरेंग्यू गायिका रुबी पेरेज यांचे गायन सुरू असतानाच छत अचानक कोसळले. असे काही होईल याचा काहीही अंदाज लोकांना नव्हता. सगळेच अचानक घडल्याने कुणालाही पळून जाता आले नाही. या घटनेत पेरेज संगीत समुहातील वादकाचाही मृत्यू झाला.

राष्ट्रपती लुइस अबिनाडर यांनी एक्सवर पोस्ट लिहित दुःख व्यक्त केले. घटना घडल्यानंतर आम्ही क्षणाक्षणाची माहिती घेत आहोत. यानंतर राष्ट्रपती अबिनाडर स्वतः घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी आलेल्या लोकांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे मात्र टाळल्याचे दिसून आले.

दरम्यान, नाइटक्लबचे छत अचानक कसे कोसळले याचे कारण अद्याप समजलेले नाही. सर्व यंत्रणा प्रभावित लोकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तरीही छत कोसळल्याच्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे बारा तासांनंतरही येथील परिस्थिती गंभीर होती. अग्निशमन दलाचे जवान लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी लाकडी फळ्या आणि ड्रिलचा वापर करत होते.

धक्कादायक! नायजेरियात गॅसोलीन टँकरचा भीषण स्फोट; तब्बल 70 लोकांचा मृत्यू

फर्स्ट लेडी रॅकेल अर्बाजे यांनी दिलेल्या माहितीनुसार नेल्सी क्रूझ यांनी राष्ट्रपती लुइस अबिनाडेर यांना रात्री एक वाजण्याच्या सुमारास इमर्जन्सी कॉल केला होता. यात त्यांनी आपण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले होते. पुढे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, येथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. माजी मेजर लीग बेसबॉल ऑल स्टार नेल्सन क्रूझ यांच्या नेल्सी क्रूझ या बहीण आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube