धक्कादायक! नायजेरियात गॅसोलीन टँकरचा भीषण स्फोट; तब्बल 70 लोकांचा मृत्यू

धक्कादायक! नायजेरियात गॅसोलीन टँकरचा भीषण स्फोट; तब्बल 70 लोकांचा मृत्यू

Nigeria News : आफ्रिकी देश नायजेरियातील नॉर्थ सेंटरमध्ये एक गॅसोलीन (Nigeria News) टँकरमध्ये जोरदार विस्फोट झाला. या दुर्घटनेत किमान 70 लोकांचा मृत्यू झाला आहे. इमर्जन्सी रिस्पॉन्स एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी नायजर प्रांतातील सुलेजा परिसराजवळ हा अपघात झाला. यावेळी काही जण गॅसोलीन एका टँकरमधून दुसऱ्या ट्रकमध्ये भरत असतानाच ही घटना घडली. इंधन ट्रान्सफरमुळे हा विस्फोट झाला. यावेळी आजूबाजूला उभे असलेले लोकही मृत्यूमुखी पडले अशी माहिती नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांनी दिली.

धक्कादायक! इंधनाने भरलेला टँकर उलटला; भीषण अपघातात तब्बल १४७ जणांचा मृत्यू

नायजरचे गव्हर्नर बागो यांनी सांगितले की राज्यातील डिक्को भागात काही लोक गॅसोलीनच्या टँकरमधून इंधन काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी आग लागली. या आगीत अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. जे लोक टँकरच्या जास्त जवळ नव्हते ते जखमी झाले. ही घटना अतिशय चिंताजनक आणि दु्र्दैवी असल्याचे बागो म्हणाले.  सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वृत्तपत्र द नेशनने स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की या घटनेत किमान 70 लोकांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियात याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. पेट्रोल टँकरमध्ये कायमच स्फोट होत असतात. या अपघातांत अनेकांना प्राण गमवावे लागतात.

याआधी मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात अशीच दुर्घटना घडली होती. नायजरमधील एका महामार्गावर पेट्रोल टँकरमध्ये मोठा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 48 लोकांचा मृत्यू झाला होता. देशात आर्थिक संकट मोठं आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाईलाजाने त्यांना इंधन पळवण्यासारखी कामे करावी लागतात. तर दुसरीकडे या घटना रोखण्यासाठी सरकारने कठोर नियम अंमलात आणावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भीषण अपघात! तेल टँकर अन् ट्रकची धडक, अपघातात 48 जण ठार; तर सुमारे 50 गुरे जिवंत जळाली

मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यातही अशीच घटना घडली होती. नायजेरियातील जिगावा या राज्यात इंधनाने भरलेला टँकर अचानक पलटला. टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. टँकर पलटी झाल्याने यातील इंधन सगळीकडे पसरले. नंतर येथे मोठा स्फोटही झाला. रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार या दुर्घटनेत तब्बल 147 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली होती. दुर्घटनेनंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर राज्य आपत्कालीन सेवा आणि पोलिसांनी या घटनेची माहिती दिली गेली. त्यांनी बचावकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube