भीषण अपघात! तेल टँकर अन् ट्रकची धडक, अपघातात 48 जण ठार; तर सुमारे 50 गुरे जिवंत जळाली
Nigeria Accident : पश्चिम आफ्रिकेतील देश नायजेरियामध्ये एका तेलाच्या टँकरची ट्रकला धडक (Accident) बसल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटात सुमारे 48 लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 50 गुरे जिवंत जळाली आहेत.
पुण्यात भाजपला मोठा धक्का! माजी आमदार शरद पवारांच्या गळाला, थेट उमेदवारीच जाहीर
ट्रक नायजर राज्याच्या अगाई येथे गुरे घेऊन जात असताना एका तेलाच्या टँकरला धडकली आणि स्फोटानंतर सुमारे 50 गुरे जिवंत जळाली. अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याच नायजरचे पोलीस महासंचालक अब्दुल्लाही बाबा-अरब यांनी सांगितलं आहे.
बाबा-अरब यांनी सुरुवातीला घटनास्थळावरून 30 मृतदेह सापडल्याचं सांगितलं होतं. परंतु, नंतरच्या निवेदनात त्यांनी सांगितले की, त्यांना आणखी 18 मृतदेह सापडले आहेत. ते म्हणाले की मृतांचे सामूहिक दफन करण्यात आलं आहे. अपघातानंतर लोकांमध्ये वाढत असलेला संताप पाहून नायजर राज्याचे गव्हर्नर मोहम्मद बागो यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.
युक्रेनवर मोठं संकट! तिजोरीत खडखडाट, सैनिकांच्या पगारालाही पैसे नाहीत; काय घडलं?
नायजेरियामध्ये माल वाहतूक करण्यासाठी सक्षम रेल्वे यंत्रणा नाही, त्यामुळे आफ्रिकेच्या सर्वाधिक लोकसंख्याच्या देशात जीवघेणे ट्रक अपघात सतत होत असतात. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या मते, 2020 मध्ये पेट्रोल टँकरचे 1531 अपघात झाले, ज्यामध्ये 535 लोकांचा मृत्यू आणि 1142 लोक जखमी झाले होते.