घरात बंद करून जिवंत जाळले, गोळ्या घातल्या… नायजेरियात बंदूकधाऱ्यांचा क्रूर हल्ला, 100 जणांचा मृत्यू

घरात बंद करून जिवंत जाळले, गोळ्या घातल्या… नायजेरियात बंदूकधाऱ्यांचा क्रूर हल्ला, 100 जणांचा मृत्यू

Nigeria Brutal Attack Gunmen Killed 100 Dead : नायजेरियामध्ये बंदूकधारींनी 100 लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांना जिवंत (Gunmen Attack) जाळले. काहींवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर अनेक लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. नायजेरियातील (Nigeria Attack) मध्य बेन्यू राज्यातील येलेवाटा गावात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 100 जणांचा मृत्यू (Crime News) झाला, असे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने आज वृत्त दिले आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा ते शनिवारी पहाटेपर्यंत हा हल्ला सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. मोठ्या प्रमाणात जखमी आहेत आणि त्यांना पुरेशी वैद्यकीय मदत मिळू शकत नाही. अनेक कुटुंबांना त्यांच्या खोल्यांमध्ये बंद करून जिवंत जाळण्यात आले, असे अ‍ॅम्नेस्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका निवेदनात म्हटलं आहे.

लग्न होऊन सुहागरात्रीच्या दिवशीच वधूने… ‘या’ घटनेमुळं वराचं अख्ख कुटुंब हादरलं

भयानक हत्याकांड

नायजेरियन अधिकाऱ्यांनी बेन्यू राज्यातील जवळजवळ दररोज होणारा रक्तपात त्वरित थांबवावा आणि खऱ्या गुन्हेगारांना न्याय मिळवून द्यावा, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. शुक्रवार रात्री उशिरा ते शनिवार 14 जून 2025 च्या पहाटेपर्यंत येलेव्टा येथे हल्ला करणाऱ्या बंदूकधाऱ्यांनी 100 हून अधिक लोकांची केलेली भयानक हत्या दर्शवते की, सरकारने राज्यात लागू केल्याचा दावा केलेले सुरक्षा उपाय काम करत नाहीत. बरेच लोक अजूनही बेपत्ता आहेत.

बंदूकधाऱ्यांचा क्रूर हल्ला

बेन्यू राज्यात हल्ल्यांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने नोंदवले आहे. या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन होत आहे आणि अन्न सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, कारण बहुतेक बळी शेतकरी आहेत. नायजेरियन अधिकाऱ्यांना हिंसाचार थांबवण्यात अपयश आल्याने जीवितहानी आणि उपजीविका धोक्यात येत आहे. जर तातडीने कारवाई केली नाही तर आणखी अनेक जीवितहानी होऊ शकतात.

Rain Alert : पुढील 24 तास धोक्याचे! पुणे, साताऱ्यासह सात जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

वांशिक आणि धार्मिक तणाव या संघर्षांना आणखी वाढवतात. गेल्या महिन्यात, बेन्यू राज्यातील ग्वेर वेस्ट जिल्ह्यात संशयित मेंढपाळांनी हल्ला करून किमान 42 लोकांची हत्या केली. संशोधन फर्म एसबीएम इंटेलिजेंसच्या मते, 2019 पासून या हिंसक संघर्षांमध्ये 500 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. सुमारे 22 लाख लोक विस्थापित झाले आहेत. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे की ,बेन्यू राज्यात हल्ल्यांच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. या हल्ल्यांमुळे मोठ्या संख्येने लोकांना त्यांचे घर सोडावे लागले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube