भारत – पाकिस्तानसह 14 देशांवर सौदी अरेबियाने घातली बंदी; कारण काय?

भारत – पाकिस्तानसह 14 देशांवर सौदी अरेबियाने घातली बंदी; कारण काय?

Saudi Arabia Banned 14 Countries :  सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेत भारत आणि पाकिस्तानसह 14 देशांवर तात्पुरता व्हिसाबंदी घातली आहे. सौदी परराष्ट्र (Saudi Arabia) मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बंदीअंतर्गत उमराह, व्यवसाय आणि कुटुंब व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी जूनच्या मध्यापर्यंत राहणार आहे मात्र ज्यांच्याकडे उमराह व्हिसा आहे ते 13 एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकतात अशी माहिती सौदी परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

सौदी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या 14 देशांवर ही व्हिसा बंदी घालण्यात आली आहे त्यात भारत (India) , पाकिस्तान (Pakistan) , बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया आणि येमेन यांचा समावेश आहे. या तात्पुरत्या बंदीमागील मुख्य कारणे बेकायदेशीरपणे हजमध्ये सहभागी होणे आणि व्हिसा नियमांचे उल्लंघन आहे.

सौदी अरेबियाने हा निर्णय का घेतला?

माहितीनुसार अनेक लोक उमराह किंवा इतर कोणत्याही कारणासाठी मल्टिपल एंट्री व्हिसा घेऊन सौदी अरेबियात येत होते आणि हजच्या वेळी परवानगीशिवाय हजमध्ये सहभागी होत होते त्यामुळे गर्दी आणि सुरक्षेच्या समस्या निर्माण होत असल्याने सौदी अरेबिया सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सौदी परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?

हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सौदी परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. सरकारने सर्व बाधित प्रवाशांना हे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा दंड टाळता येईल. यासोबतच, अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की या व्हिसा बंदी असूनही जे लोक सौदी अरेबियात बेकायदेशीरपणे राहतात त्यांना पुढील पाच वर्षे देशात प्रवेश दिला जाणार नाही.

राज्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणे हेच राज्याचे धोरण…मंत्री विखेंनी सांगितला मेगा प्लॅन

हज यात्रेसाठी डिजिटल मार्गदर्शक जारी

हज आणि उमराह मंत्रालयाने अलीकडेच 16 भाषांमध्ये एक डिजिटल मार्गदर्शक जारी केले आहे, ज्यामध्ये उर्दू, इंग्रजी, अरबी, तुर्की, फ्रेंच, पर्शियन आणि इंडोनेशियन यासारख्या भाषांचा समावेश आहे. हे मार्गदर्शक पीडीएफ आणि ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे आणि मंत्रालयाच्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येते. विविध देशांमधून येणाऱ्या यात्रेकरूंना हजच्या नियम आणि प्रक्रियांबद्दल चांगली माहिती देणे हा त्याचा उद्देश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube