Kasba Bypoll : अजित पवारांचा ‘रोड’शो… भाजपकडून उदयनराजेंचे उत्तर!

पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP), बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, आर.पी.आय.(RPI), राष्ट्रीय समाज पक्ष (RPI), शिवसंग्राम, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा पेठ मतदार (Kasba Peth Bypoll) संघ पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारार्थ खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांचा आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भव्य रोड शो होणार आहे. कसबा मतदार […]

Ajit Pawar Udayanraje Bhosle

Ajit Pawar Udayanraje Bhosle

पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP), बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, आर.पी.आय.(RPI), राष्ट्रीय समाज पक्ष (RPI), शिवसंग्राम, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा पेठ मतदार (Kasba Peth Bypoll) संघ पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारार्थ खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांचा आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भव्य रोड शो होणार आहे.

कसबा मतदार संघातील मांगीरबाबा चौकातून या ‘रोड’शो ला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सरळ म्हसोबा चौकातून उजवीकडे बालशिवाजी मंडळापासून सेनादत्त पोलीस चौकीपासून डाव्या हाताने गांजवे चौकातून उजवीकडे वळून नवी पेठ विठ्ठल मंदिरपासून पुढे हत्ती गणपती चौकातून भावे हायस्कूल, राजाराम मंडळावरून सरळ खालकर चौक, प्रभात प्रेम, माती गणपती, केसरीवाडा, रमणबाग चौक, शिंदे पार येथून उजवीकडून मोती बागेतून शनिवार वाड्याला वळसा घालून शिवाजी रोडवरून मोटे मंगल कार्यालयापासून तांबट आळी, त्वष्टा कासार, माणिक चौक, व्यवहार आळी, फडके हौद, गणेश रस्त्यावरून लाल महाल येथे या बाईक रॅलीचा समारोप होणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

Exit mobile version