Download App

kasba Bypoll : धंगेकरांच्या पायाखालची वाळू सरकलीय; भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

kasba Bypoll : भारतीय जनता पार्टीने (BJP) पैसे पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला. त्यानंतर येथील राजकारण तापले आहे. भारतीय जनता पार्टीनेही आक्रमक होत धंगेकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी धंगेकर यांना पराभव दिसत असल्याने ते असे खोटे आरोप करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका केली आहे.

वाचा : देवेंद्र फडणवीस यांचा मोदी पॅटर्न, कसबा-चिंचवडचा प्रचार संपताना टीव्हीवर मुलाखत 

ते म्हणाले, की रवींद्र धंगेकरांचे आरोप खोटे आहेत.पराभव दिसताच भारतीय जनता पक्षावर खोटे आरोप करायचे आणि त्यातून मतदारांची सहानुभूती मिळवायची हा त्यांचा प्रयत्न आहे. पण, कसब्यातील मतदार सूज्ञ आहेत. ते अशा खोट्या अफवेला बळी पडणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत येथ हजारोंची पदयात्रा निघाली. त्यातून हे स्पष्ट झाले आहे की येथील मतदारांचा कौल हा भाजपलाच राहणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भाजप उमेदवारावर आरोप करून त्यांना काहीही मिळणार नाही. मी धंगेकरांना आव्हान देतो की भारतीय जनता पार्टीवरचे आरोप सिद्ध करा, त्याचे पुरावे द्या अन्यथा असे खोटे आरोप करून भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असे मुळीक यांनी सांगितले.

Kasba By Election : भाजपकडून कसब्यात पैशांचे वाटप; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

दरम्यान, या आरोपांनंतर धंगेकरांनी जोपर्यंत नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रशासनाकडून धंगेकर यांना चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

Tags

follow us