देवेंद्र फडणवीस यांचा मोदी पॅटर्न, कसबा-चिंचवडचा प्रचार संपताना टीव्हीवर मुलाखत

  • Written By: Published:
देवेंद्र फडणवीस यांचा मोदी पॅटर्न, कसबा-चिंचवडचा प्रचार संपताना टीव्हीवर मुलाखत

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीचा प्रचार थांबला. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपला पण या निवडणुकीत सत्ताधारी भाजप शिवसेनेकडून मोठे प्रयत्न केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा आणि चिंचवड दोन्ही मतदारसंघात शर्थीने प्रयत्न केले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मतदारसंघात रोड शो आणि जाहीर सभाही घेतल्या पण प्रचाराच्या तोफा थंडावत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये राज्यातील प्रश्न, मंत्रिमंडळ या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलीच पण सोबत कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीवरही त्यांनी उत्तर दिली.

हेही वाचा : उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावे लागले? हे पण लोकांना समजावून सांगावे, राष्ट्रवादीचा फडणवीस यांना खोचक टोला

देवेंद्र फडणवीस यांचा मोदी पॅटर्न

‘झी २४ तास’ची देवेंद्र फडणवीस यांची ही मुलाखत कसबा-चिंचवडचा प्रचार थंडावत असताना टीव्हीवर प्रसारित केली जात होती. आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा अशा प्रकारच्या प्रचार पॅटर्नचा वापर केला आहे. २०१४ पासून मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठ्या माध्यम संस्थाना मुलाखत देऊन अनेक प्रश्नांना उत्तर देण्याची पद्धत वापरली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनीही याच पॅटर्नचा वापर केला असं म्हणता येईल.

देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये कसबा पोटनिवडणूकच्या मुद्द्यावर बोलताना गिरीश बापट यांची उपस्थिती, मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी न देणं,  ब्राम्हण मतदारांची नाराजी अशा प्रश्नांला उत्तर दिली.

फडणवीस पुण्याचे खासदार ?

गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा लढणार, अशी चर्चा होती. देवेंद्र फडणवीस यांना आजच्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी थेट नकार न देता, पक्षाने सांगितलं तर गडचिरोलीमध्येही निवडणूक लढवेल, अशी पुष्टी जोडली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube