Download App

Sanjay Raut : ‘मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं तरी कसबा-चिंचवड पोटनिवडणुका होणारच’

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी जरी आवाहन केलं असेल किंवा राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी जरी पत्र लिहलं असेल तरीही कसबा (Kasba)आणि चिंचवडच्या (Chinchawad) निवडणुका होतीलच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही. त्याप्रमाणं संपर्क होण्याची शक्यता देखील नसल्याचं खासदार राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं. अंधेरी पोटनिवडणूक हा अपवाद असला तरी तिथं निवडणूक झाली होती. पंढरपूरला आणि नांदेडला देखील पोटनिवडणूक झाली होती. त्या ठिकाणी अपवाद पाळला नसल्याचं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व्हावी, अशी लोकांची इच्छा असल्याचं वक्तव्य शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. त्यामुळं दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचेच (Mahavikas Aghadi)उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, या दोन्ही जागा जिंकणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय. त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कसब्याची जागा काँग्रेस (Congress) लढवणार तर चिंचवडच्या जागेबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छूक असल्याचंही राऊत यांनी यावेळी सांगितलंय.

राऊत म्हणाले की, राज्यातील वातावरण शिंदे फडणवीस सरकारला अनुकूल नाही. त्यामुळं आम्ही कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. विधानपरिषदेच्या निकालावरुन सरकार विरोधात असणारं वातावरण दिसल्याचं राऊत यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळं कसबा आणि चिंचवड विधानसभेचा निकाल वेगळा लागू शकतो असंही राऊत म्हणाले. या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका व्हाव्यात ही लोकांची इच्छा आहे. त्याबद्दलचा आम्ही सर्वे केलाय. त्यामुळं या निवडणुका लढवण्याचा महाविकास आघाडीनं निर्णय घेतलाय. आम्हाला भूमिका स्पष्ट करायच्या असल्याचं यावेळी राऊत यांनी सांगितलं.

Tags

follow us