Download App

एक तरी आमदार निवडून आणा; केसीआरच्या अब की बार… घोषणेवर शरद पवारांचा खोचक टोला

  • Written By: Last Updated:

राज्यात काही दिवसापूर्वी तेलंगणाचे मुख्यंमत्री केसीआर यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांनी “अबकी बार किसान सरकार” अशी घोषणा दिली होती. त्यावर देखील शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते राजकीय पक्ष चालवतात. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. पण किमान एक आमदार तरी निवडून आणा, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

बारसू रिफायनरीच्या मुद्द्यांवरून आज शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील प्रश्न विचारण्यात आले. त्यांमध्ये काही काही दिवसापूर्वी तेलंगणाचे मुख्यंमत्री केसीआर यांची जाहीर सभा झाली होती. त्यावर देखील त्यांची भूमिका विचारण्यात आली. बाजूच्या राज्याचे मुख्यंमत्री येतात आणि घोषणा करतात. “अबकी बार किसान सरकार”  त्यावर शरद पवार यांची भूमिका काय असा प्रश्न विचारण्यात आला.

Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला

त्यावर मी काय सांगणार, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यावर त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे. अशी भूमिका त्यांनी घेतली. ते पुढे म्हणाले की, ते एक राजकीय पक्ष चालवतात, त्या राजकीय पक्षाचा हा कार्यक्रम आहे. त्यांना त्यांची भूमिका मांडायचा अधिकार आहे.

या सभेत केसीआर म्हणाले होते की पुढचा मुख्यमंत्री शेतकरी असावा, त्यावर शरद पवार यांनी किमान एक आमदार तरी निवडून आणा म्हणावं अशी खोचक प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, ज्यांच्याकडे एक आमदार नाही, त्यांनी याची चर्चा करायची म्हणजे काय?

राहुल गांधी भगवा हातात घ्या, मग आम्ही काँग्रेसचेच; गुलाबरावांच्या वक्तव्याने खळबळ !

त्याचे दौरे मी कसे सांगणार?

केंद्रीय मंत्री अमित शाह पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मागच्या काही दिवसात अमित शाह यांचे दौरे वाढले आहेत. या प्रश्नांवर बोलताना शरद पवार म्हणाले की ते केंद्रीय मंत्री आहेत. ते दौरे करू शकतात. त्यांच्या दौऱ्याविषयी मी काय सांगणार. त्यांचे दौरे मी थांबवू शकत नाही. असं उत्तर त्यांनी दिलं.

Tags

follow us