Download App

पोटात एक आणि ओठात एक हा तुमचा स्वभाव, आजोबांची पूर्ण हयात…; भाजपची आदित्य ठाकरेंवर टीका

  • Written By: Last Updated:

Keshav Upadhyay On Aditya Thackeray : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील याचं उपोषण सुरू आहेत. ते त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं, असं वक्तव्य केलं. यावरून उबाठाचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली होती. त्याला आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी प्रत्युत्तर दिलं.

केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यात लिहिलं की, आजोबांची पूर्ण हयात ज्यांचा विरोध करण्यात गेली, ज्यांनी वाढवलं, ज्यांनी महाराष्ट्राला विचार दिला, त्यांच्या विचारांशी गद्दारी केली, तुम्ही तुमच्या आजोबांच्या विचाराचे नाही राहू शकला, त्यामुळं महाराष्ट्राच्या विचाराचं सोडा. महाराष्ट्रातला एकही नागरिक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, अशी टीका केली.

https://x.com/keshavupadhye/status/1701961843819069784?s=20

उपाध्ये यांनी पुढं लिहिलं की, पोटात एक आणि ओठात एक हा तुमचा स्वभाव आहे. शिंदे फडणवीस यांना मोकळेपणाने बोलता तरी येतंय. अडीच वर्षे न बोलता तुम्ही काय काय केलंय हे सगळ्यांना बघितलं. मोदींच्या नावाने मतं मागितलं, आणि विचारांशी गद्दारी करून सत्ता हापापली. भ्रष्टाचार केला. महाराष्ट्र रसातळाला नेला. महाराष्ट्रातील जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार हे बघा, असा खोचक टोला उधाध्ये यांनी लगावला.

SC मोठा निर्णय! सरकारने मीडिया ब्रीफिंगबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनवावी; मीडिया ट्रायलमुळे न्याय प्रभावित 

आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिलं की, “बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!” – घटनाबाह्यच मुख्यमंत्री. ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशीलता? खरंतर हीच ती गद्दार वृत्ती! गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतो आहे, या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच, पण, देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

आदित्य ठाकरें काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले, “बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं -घटनाबाह्य मुख्यमंत्री. ही ह्यांची मराठा आंदोलकांप्रती संवेदनशीलता आहे का? खरंतर हीच ती गद्दार वृत्ती. गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकूण घेत आहे, अशी टीका आदित्य यांनी केली होती.

त्यावर आता उपाध्ये यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आता या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us