Download App

कोपरगावमध्ये महायुतीचा गुलाल! आशुतोष काळे यांचा दणक्यात दुसऱ्यांदा विजय

  • Written By: Last Updated:

Mahayutis Ashutosh Kale Wins Second Time : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार (Assembly Election Result 2024) आहे. महायुतीची सत्ता राज्यात पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला (Ashutosh Kale) लागलेली आहे. दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आलीय.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत आशुतोष काळे यांना 1,06,407 मतं मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे संदीप वर्पे यांना 23,274 मतं मिळाली आहे. काळेंचा दणक्यात दुसऱ्यांदा विजय झाल्याचं चित्र आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे बारावी फेरी जाहीर झाली आहे. यामध्ये आशुतोष काळे हे 76,032 मतांनी आघाडीवर आहेत.

रिसोड मतदारसंघातील झनक घराण्याचे वर्चस्व संपुष्टात येणार? भावना गवळी आघाडीवर…

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांचा विजय जवळपास निश्चितच मानला जात आहे. महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा मान मिळवण्याची संधी आशुतोष काळे यांनी मिळवली आहे.

Parli Vidhan Sabha Result : परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; तब्बल 50 हजारांनी मिळवला विजय

आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात भरपूर विकास कामे केली. विकास कामाबरोबरच सर्व जनतेशी संपर्कात राहिले, सर्व समाजाच्या, सर्व जाती-धर्माच्या, सर्व स्तरातील जनतेच्या सुख-दुःखात सहभागी झाले. गावावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस धावून आले. कोविड असो अथवा महापूर असो काळे-कोल्हे यांची यंत्रणा सर्वात पहिले मदतीला असते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करून कोपरगावची सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे यंदाही कोपरगावकरांनी काळेंनाच कौल दिल्याचं दिसतंय.

 

follow us