Result Update : मराठवाड्यात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?; एका क्लिकवर मिळवा अपडेट

  • Written By: Published:
Result Update : मराठवाड्यात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?; एका क्लिकवर मिळवा अपडेट

Marathwada Assembly Election Result Live Updates 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू झाली आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या 48 जागा आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. तसंच, जरांगे फॅक्टरचं प्रमुख केंद्रही मराठवाडाचं आहे. त्याचा लोकसभेला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आज विधानसभेच्या निकालात हा फॅक्टर कायम राहतो का? हे पाहण महत्वाचं आहे. सध्या मराठवाड्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी काटे की टक्कर पाहायला मिळते. आपल्याला प्रत्येक जागेची माहिती आपल्याला याच बातमीत मिळणार आहे. आपण या बातमीवर लक्ष असुद्या…

 

मराठवाड्यात सध्याच्या घडीला महायुती 32 जागांवर आघाडीवर आहे. तर 8 जागांवर महाविकास आघाडीवर होते. तसं पाहता महायुतीने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. परंतु, निकालाची ही सुरूवातच असल्याने यामध्ये अनेक ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पोस्टल मतमोजणीत महायुती आघाडीवर असून भाजप आणि शिंदे गटाला आतापर्यंत २४ जागा तर महाविकास आघाडीला  ३ जागा असून इतर पक्षांना १ असे आघाडीचं स्वरुप समोर येत आहे.

 

कालीचरण यांचे वक्तव्य भोवले, संजय शिरसाट यांची पिछेहाट
संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. आता संजय शिरसाट मागे पडले आहेत.

गंगाखेड मतदारसंघात विशाल कदम आघाडीवर
गंगाखेड विधानसभा मतदार संघात सध्या उद्धव ठाकरे गटाकडे विशाल कदम यांना ५२६४ , तर डॉ.रत्नाकर गुट्टे हे ३९८७ मतांनी पिछाडीवर आहेत.

संजना जाधव आघाडीवर पती हर्षवर्धन जाधव पिछाडीवर
शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव आघाडीवर तर पती हर्षवर्धन जाधव पिछाडीवर पडले आहेत. तर दुसरीकडे बदनापूर मतदारसंघात कुचे यांनी आघाडी घेतली आहे.

अमित देशमुख पहिली फेरी,167 मतांनी पुढे
लातुर शहर, अमित देशमुख पहिली फेरी,167 मतांनी आघाडीवर

भाजपाच्या मेघना बोर्डीकर बिछाडीवर
परभणीमधून शिंदे गटाचे आनंद भरोसे हे आघाडीवर आहेत. तर भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांना 3481, शरद पवार गटाचे विजय भांबळे यांना 3924 मते, भांबळे 443 ची लीड

संतोष दानवे १२०० मतांनी आघाडीवर
भोकरदन मधून भाजपचे संतोष दानवे 1200 मतांनी आघाडीवर आहे

कैलास पाटील 2800 मतांनी आघाडीवर
उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडीचे कैलास पाटील 2800 मतांनी पहील्या फेरीत आघाडीवर

राणा जगजितसिंह पाटील ७०० मतांनी पुढे
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पहिली फेरीत राणा जगजितसिंह पाटील ७०० मतांनी आघाडीवर आहेत.

तानाजी सावंत, संतोष दानवे, योगेश क्षीरसागर आघाडीवर
पोस्टल मतदानात संतोष दानवे यांनी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे परतूर मतदारसंघातून भाजपचे बबनराव लोणीकर, जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकर, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, मध्य मधून प्रदीप जैस्वाल आघाडीवर आहेत. दुसरीकडे भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर, बीडमधून योगेश क्षीरसागर आघाडीवर आहेत. तर परंडामध्ये तानाजी सावंत आघाडीवर आहेत.

धनंजय मुंडे 4000 मतांनी आघाडीवर
परळीत धनंजय मुंडे हे 4000 मतांनी आघाडीवर आहे. तर राजेसाहेब देशमुख हे पिछाडावरी आहेत.

श्रीजया चव्हाण, अमित देशमुख आघाडीवर
अमित देशमुख पोस्टल फेरीत आघाडीवर आहेत. पोस्टल फेरीत धिरज देशमुख आघाडीवर आहेत. तर भोकर मतदारसंघात श्रीजया चव्हाण आघाडीवर आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून पहिला कल, अतुल सावे आघाडीवर
औरंगाबाद पूर्व भागात भाजपचे अतुल सावे हे आघाडीवर असल्याचा पहिला कल आला आहे. त्यांच्याविरोधात एमआयएमचे इम्तियाज जलील हे आहेत.

घनसावंगीत राजेश टोपे १९०० मतांनी पिछाडीवर
घनसावंगीत शरद पवार गटाचे राजेश टोपे १९०० मतांनी पिछाडीवर

अतुल सावे यांना धक्का, इम्तियाज जलील २४,००० मतांनी आघाडीवर
भाजपाचे अतुल सावे यांना धक्का, तर एमआयएमचे इम्तियाज जलील २४,००० मतांनी आघाडीवर

धनंजय मुंडे 15992 आघाडीवर
परळी विधानसभा निवडणुकीत चौथ्या फेरी अखेरीस धनंजय मुंडे 15992 आघाडीवर

गणेश हाके 3492 मतांनी आघाडीवर
लातुर– अहमदपूर मतदारसंघातील गणेश हाके हे चौथ्या फेरीत 3492 मतांनी आघाडीवर

राणाजगजितसिंह पाटील चौथी फेरी आखेर 5550 मताने आघाडीवर
धाराशिवमधील तुळजापूर मतदारसंघातून भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील चौथी फेरी आखेर 5550 मताने आघाडीवर

संभाजीराव पाटील निलंगेकर सहावी फेरी, 5442 मतांनी आघाडीवर
लातुर जिल्ह्यातील निलंगा, भाजपा संभाजीराव पाटील निलंगेकर सहावी फेरी, 5442 मतांनी आघाडीवर

परळीत धनंजय मुंडे यांची 22 हजार मतांची आघाडी
परळीत धनंजय मुंडे यांची 22 हजार मतांची आघाडी, देशमुख यांना मोठा फटका

जालना जिल्ह्यातील पाचही जागांवर महायुती आघाडीवर
जालना जिल्ह्यातील पाचही जागांवर महायुती आघाडीवर

महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी 2721 मतानी पुढे
उमरगा विधानसभा मतदारसंघ चौथ्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी 2721 मतानी पुढे

अभिमन्यू पवार तिसऱ्या फेरीत 6515 मतांनी आघाडीवर
लातुर–औसा ,भाजपा अभिमन्यू पवार तिसऱ्या फेरीत 6515 मतांनी आघाडीवर

राणाजगजितसिंह पाटील सहाव्या फेरी अखेर 8257 आघाडीवर
तुळजापुर – महायुतीचे राणाजगजितसिंह पाटील सहाव्या फेरी अखेर 8257 आघाडीवर

राणाजगजितसिंह पाटील हे जिल्ह्यातील भाजपाचे एकमेव उमेदवार –

कॉग्रेसचे धीरज पाटील विरुद्ध भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील अशी थेट झाली होती लढत

संजय शिरसाट आघाडीवर, राजू शिंदे पिछाडीवर
शिंदे सेनेचे संजय शिरसाट आघाडीवर तर उद्धव सेनेचे राजू शिंदे पिछाडीवर

केज मतदारसंघात पृथ्वीराज साठे आघाडीवर
केज मतदारसंघात फेरी क्र. : 5 नमिता मुंदडा – 15683 पृथ्वीराज साठे – 18135 आघाडी-2452 (पृथ्वीराज साठे)

महायुतीसह एमआयएम आघाडीवर
धनंजय मुंडे, तानाजी सावंत, इम्तियाज जलील यांना मराठवाड्यात आघाडी मिळाली आहे. तर अमित देशमुख पिछाडीवर आहेत.

कैलास पाटील सहावी फेरीअखेर 24 हजार 82 मतांनी आघाडीवर
कळंब मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे कैलास पाटील सहावी फेरीअखेर 24 हजार 82 मतांनी आघाडीवर

विशाल कदम 38 हजार 929 मतांनी आघाडीवर
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे विशाल कदम 38 हजार 929 मतांनी आघाडीवर आहेत. रासपचे रत्नाकर गुट्टे यांना 38 हजार 167 मते मिळाली आहेत.

धनंजय मुंडे 77924 आघाडीवर
परळी विधानसभा तेराव्या फेरी अखरीस. धनंजय मुंडे 77924 आघाडीवर

परंडा विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर तानाजी सावंत आघाडीवर
परंडा विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर तानाजी सावंत आघाडीवर

तानाजी सावंत यांना 218 मतांची आघाडी

शरद पवार गटाचे राहुल मोटे आणि तानाजी सावंत यांच्यात कडवी झुंज

विशाल कदम 38 हजार 929 मतांनी आघाडीवर
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे विशाल कदम 38 हजार 929 मतांनी आघाडीवर आहेत. रासपचे रत्नाकर गुट्टे यांना 38 हजार 167 मते मिळाली आहेत.

परळी – परळी विधानसभा मतदारसंघात सध्या 26 पैकी 11 फेऱ्या झाल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी पवार गटाचे धनंजय मुंडे यांना 83,411 मते मिळाली आहेत. तर शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना 20 हजारांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

औरंगाबाद पूर्व – औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात अतुल सावे सध्या पराभवाच्या छायेत आहेत. याठिकाणी एमआयएमचे उमेदवार आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना 75,232 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे अतुल सावे यांना 46,623 मते मिळाली आहेत. आता मत मोजणीच्या 24 पैकी 15 फेऱ्या झाल्या आहेत.

सिल्लोड – सिल्लोडमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. मतमोजणीच्या 29 पैकी 14 फेऱ्या झाल्या आहेत. याठिकाणी शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार यांना 65,178 मते मिळाली आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे सुरेश बनकर यांना 62,517 मिळाली आहेत. केवळ दोन हजारांच्या मतांचा फरक आहे.

भोकरदन – भोकरदन विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी मोठी काळजी घेतली. त्याचा परिणाम दिसून आला. याठिकाणी मतमोजणीच्या 24 पैकी 9 फेऱ्या पूर्ण झाल्या. त्यात संतोष दानवे यांना 50,977 जागा तर शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे यांना 39,006 मते मिळाली आहेत.

जालना – जालना विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 24 पैकी 9 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांना 41,548 तर काँग्रेसचे कैलास गोरंटयाल यांना 28,549 मते मिळाली.

घनसावंगी – या मतदारसंघात राजेश टोपे पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या 26 पैकी 10 फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्यात सेनेचे हिकमत उढाण यांना 42,712 इतकी मतं मिळाली आहेत. तर राजेश टोपे यांना 36,005 इतकी मतं मिळाली आहेत.

कळमनुरी – या मतदारसंघात मतमोजणीच्या 26 पैकी 14 फेऱ्यांमध्ये शिंदेसेनेचे संतोष बांगर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 73,055 मते मिळाली आहेत. तर डॉ. संतोष तारफे यांना 49,138 मते मिळाली आहेत.

भोकर – भोकर मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांना 47,952 मते मिळाली आहेत. तर विरोधातील तिरुपती कदम यांना 30,754 मतं मिळाली आहेत.

परभणी – परभणी मतदारसंघात उद्धव सेनेचे डॉ. राहुल पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना 83,539 मते मिळाली आहे. तर सिंदे सेनेचे आनंद भरोसे यांना 57,418 मते मिळाली आहे. मतमोजणीच्या 25 पैकी 16 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

परंडा- या मतदार संघात सध्या काँटे की टक्कर सुरू आहे. मतमोजणीच्या 27 पैकी 13 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. शिंदे सेनेचे नेते तानाजी सावंत यांना 48,047 मतं मिळाली आहेत. तर शरद पवार गटाचे राहुल मोटे यांना 47,267 मतं मिळाली आहेत. 780 मतांनी मोटे पिछाडीवर आहेत.

तुळजापूर- या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा दिसून येत आहे. राणा जगजीतसिंह पाटील यांनी मोठी लीड घेतली आहे. मतमोजणीच्या 30 पैकी 17 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पाटील यांना 78,969 मते मिळाली आहेत. तर कुलदीप कदम पाटील यांना 57,359 मते मिळाली आहेत.

लातूर शहर – या मतदारसंघात अमित देशमुख हे सध्या आघाडीवर आहेत. त्यांना 62,065 मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या डॉ. अर्चना चाकूरकर पाटील यांना 54,670 मते मिळाली आहेत. सध्या मतमोजणीच्या 28 पैकी 15 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

लातूर ग्रामीण – या मतदारसंघात सध्या काँटे की टक्कर सुरू आहे. काँग्रेसचे धीरज देशमुख यांना 54,362 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे रमेश कराड यांनी दोन हजारांची आघाडी घेतली आहे. त्यांना 56,604 मतं मिळाली आहेत. मतमोजणीच्या 26 पैकी 14 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

 

Maharashtra Election Result : कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का

follow us
  • fb
  • instagram
  • youtube