Download App

Rohit Pawar : कोश्यारी आता काही बोलतील, कोणीही विश्वास ठेवू नये

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : ‘माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता महाराष्ट्रात नाही. मोठा दबाव केंद्र सरकारने राज्य शासनावर महाराष्ट्रातील जनतेवर आणला होता. पण त्यांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रातील जनतेने विरोध केला. कारण त्यांनी महापुरुषांचा अपमान केला होता. ते आता महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत ते कोठे, कधी, काही बोलतील. खरे बोलतील की, खोटे बोलतील यावर आता कोणीही विश्वास ठेवू नये. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.

पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार साह्यांचे पत्र घेऊन आले होते. या माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले की, आता आलेले राज्यपाल अ‍ॅडमिट्रेशनमध्ये खुप चांगले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे राज्यपाल येत असतील तर सामान्य लोकांमध्ये व अभ्यासकांमध्यें वेगळी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपती राजवट येत्या काही महिन्यांमध्ये या राज्यामध्ये येईल काय एखादा सक्षम असा राज्यपाल जो त्यांच्याच बाजूचा असेल राज्यामध्ये जे काही निर्णय घ्यायचे ते सक्षमपणे घेण्यात यावी यासाठी नवीन राज्यपाल आणले असावेत काय असा प्रश्न काही अभ्यासकांच्या मनामध्ये आला आहे. असं रोहित पवार म्हणाले.

संजय राऊत भडकले.. म्हणाले कोश्यारी खोटारडे; १२ आमदारांच्या मुद्द्यावर दिले प्रत्युत्तर

महाराष्ट्रात निवडणूका झाल्या पाहिजे माझ मत आहे तर लोकांच पण ते मत आहे , mpsc चे विद्यार्थी आंदोलन करत होते मुख्यमंत्री जवळुन गेले परंतु त्यांना भेटले नाही त्यांनी युवानां दुर्लक्षित केले, अनेक उद्योग महाराष्ट्रातुन बाहेर गेले येथे पण युवकांची चेष्टा झाली. शेतकऱ्याच्या बाबतीत पण तेच झाले कांद्याचे भाव कापसाचे भाव कमी झाले याकडे पण दुर्लक्ष केले गेले.

सामान्य लोकांना दुर्लक्षित केले जाते व राजकीय फक्त मोठमोठे प्रवेश करून घेतले जातात मोठमोठे वक्तव्य केले जातात.निवडणूकां कडे लक्ष दिले जाते. मग हे सरकार निवडणूक लढण्यासाठी आले का सामान्य जनतेची काळजी घेण्यासाठी आले त्यामुळे लोकांची भावना आहे की हे सरकार जाऊन लोकांच्या विचारात सरकार यायला हवं.

Tags

follow us