पाथर्डी : ‘आम्ही लोकांच्या हिताच्या भूमिकेतून उपोषण केले. आंदोलनकर्ते उपोषणस्थळी जेवण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. ते काय खिशात ठेवायला आहेत का? तुमच्याकडे असतील तर ते लाईव्ह करा. आम्ही खऱ्या चार-पाच उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी काही खातानाचे कुठे फोटो आला, तर हा निलेश लंके आत्ता या क्षणी विधानसभेचा राजीनामा देईल. असे आव्हान आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता दिले.’
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर शहर आणि जिल्ह्यामधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत अहमदनगर जिल्हाधकारी कार्यालायासमोर हे रस्ते लवकरात लवकर दुरूस्त करण्यात यावेत यासाठी उपोषण केले होते. त्यावेळी भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी लंके यांच्या कार्यकर्त्यांनी, उपोषणकर्त्यांनी उपोषणस्थळी जेवण केले असा आरोप केला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत असं देखील विखे म्हणाले होते.
त्यावर आता पाथर्डी याठिकाणी बोतताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांना थेट आव्हान केले आहे. लंके म्हणाले की, ‘आंदोलनकर्ते उपोषणस्थळी जेवण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. ते काय खिशात ठेवायला आहेत का? तुमच्याकडे असतील तर ते लाईव्ह करा. आम्ही खऱ्या चार-पाच उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी काही खातानाचे कुठे फोटो आला, तर हा निलेश लंके आत्ता या क्षणी विधानसभेचा राजीनामा देईल.’ त्यामुळे आता खासदार विखे हे फोटो आणि व्हिडिओ समोर आणणार का ? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.