Lawrence Bishnoi Gets Offer To Contest Maharashtra Elections : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजलंय, तारखा जाहीर झाल्यात. उमेदवारांच्या नावांची देखील अधिकृत घोषणा होत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याचं समोर आलंय. कोणत्या राजकीय पक्षाने ही ऑफर दिलीय? हा प्रश्न सर्वांसमोर आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईची तुलना या पक्षाने थेट शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग यांच्याशी केल्याची देखील माहिती मिळतेय.
पुण्यातील मतदान केंद्रांत वाढ करा; जिल्हा निवडणूक विभागाचे केंद्रीय आयोगाला पत्र
सलमान खानचा शत्रु म्हणून ओळखला जाणारा गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आलाय. लॉरेन्सला एका राजकीय पक्षानं (Lawrence Bishnoi Latest News) थेट निवडणूक लढवण्याची ऑफर दिलीय. लॉरेन्स बिश्नोई सध्या अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे. उत्तर भारतीय विकास सेनेने त्याला विधानसभा निवडणुकीची ऑफर दिलीय. पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी यासंदर्भात लॉरेन्स बिश्नोईला पत्र देखील लिहिलंय.
उत्तर भारतीय विकास सेनेने मुंबईत विधानसभा मतदारसंघात चार उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं ठरवलं आहे. यासाठी त्यांची नावं देखील निश्चित करण्यात आलीय. लॉरेन्स बिश्नोई यांनी मंजुरी दिल्यानंतर अजून 50 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली जाईल, असं उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी म्हटलंय. लॉरेन्स बिश्नोईमध्ये आपण शहीद भगतसिंग पाहत असल्याचं देखील त्यांनी पुढे निवेदनात म्हटलंय. निवडणुकीमध्ये विजयी करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईला पक्षाचे कार्यकर्ते अन् अधिकारी प्रयत्न करतील, असं देखील त्यांनी पक्षाच्या निवेदनात म्हटलंय.
निवडणुकीमुळे विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटताहेत; CM शिंदेंची फटकेबाजी…
गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला लिहिलेल्या पत्रामध्ये सुनील शुक्ला यांनी म्हटलंय की, तुम्ही पंजाबमध्ये जन्मलेले उत्तर भारतीय आहात. याचा आम्हाला अभिमान आहे. आमचा उत्तर भारतीय विकास सेना या नावाने राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. पक्ष देशात उत्तर भारतीयांच्या हक्कांसाठी काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लॉरेन्स बिश्नोई निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उतरल्यास इतर राजकीय पक्षांना याचा फटका बसणार का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.