Shambhuraj Desai On Vinayak Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई या दोन नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिंदे गटातील आमदार खासदार त्यांच्या पक्षात नाराज आहेत, ते लवकरच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला होता. त्यावर आता मंत्री शंभुराज देसाईंनी विनायक राऊतांना अब्रुनुकसानीची नोटीस (Legal notice)पाठवली आहे. विनायक राऊत यांना आपल्या दाव्याचा खुलासा करण्यास शंभुराज देसाईंना सांगितले आहे. आपले वक्तव्य मागे न घेतल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा यावेळी मंत्री शंभुराज देसाईंनी दिला आहे.
गृहमंत्र्यांच्या दाव्यामुळे इम्रान खान यांचा पाय आणखी खोलात जाणार?
यावेळी मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, महाविकास आघाडीतील आजी, माजी आमदार,आजी-माजी नेते आमच्यातील वेगवेगळ्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे वेळ येईल तेव्हा ते आम्ही दाखवू असंही यावेळी शंभुराज देसाई म्हणाले. त्याचवेळी देसाई म्हणाले की, मी विनायक राऊत यांना लीगल नोटीस पाठवली आहे.
नोटीसीमध्ये मुदतीत त्याचा खुलासा किंवा उत्तर देण्याचं नोटीसीत वकीलांमार्फत कळवलेलं आहे. त्यात जर समाधानकारक उत्तर आलं नाही आणि केलेलं वक्तव्य विनायक राऊतांनी माघारी घेतलं नाही तर त्याच्यावर वकिलांच्या सल्ल्याने पुढची लीगल कारवाई लगेच केली जाणार असल्याचा इशारा यावेळी शंभुराज देसाईंकडून देण्यात आला आहे.
विनायक राऊत यांनी केलेल्या दाव्यावर शंभुराज देसाईंनी आक्षेप घेतला होता, आपलं वक्तव्य मागे घेण्यासाठी राऊतांना देसाईंकडून लीगल नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं होतं मात्र त्यावर विनायक राऊतांनी कोणतीही प्रतिक्रीया न आल्याने त्यांना लीगल नोटीस पाठवली आहे.